
मानवाधिकार आयोग इमर्जन्सी हेल्पलाइन असोसिएशन, दिल्ली येथील राळेगाव शाखेची वार्षिक आढावा बैठक दिनांक 7 मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या आढावा बैठकी साठी महाराष्ट्र राज्य सचिव साहेबराव राठोड तथा सलमान शेख अमरावती जिल्हा अध्यक्ष प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते..सदर वार्षिक आढावा सभेत राळेगाव तालुक्यातील मानवाधिकार संघटने मार्फत करण्यात आलेल्या विविध कामकाजाचा आढावा घेऊन भविष्यात करण्यात येणाऱ्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.यासभेला राळेगाव तालुका अध्यक्ष डॉ. बी. एम. काकरे, उपाध्यक्ष सूचित बेहेरे, सचिव विनोद चिरडे, प्रमुख अतिथी राजेश शर्मा, संघटनेचे सदस्य हनुमान राडे,संदीप राऊत, दामोदर महाजन, संजय अराडे,माधुरी खडसे,कांता मडावी, कुसुमताई कुमरे,जया कामराम,सुनीता ढगले,शुभांगी नाखले यावेळी हजर होते….
