
राळेगाव येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते व समाजहिताची जाणीव जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले नाझीम शेठ पठाण यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. समाजातील विविध घटकांशी सलोख्याचे संबंध ठेवत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या नाझीम शेठ पठाण यांच्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये विशेष आदरभाव असल्याचे यावेळी दिसून आले.
वाढदिवसानिमित्त शशिकांत पेंदोर, शिव पेंदोर व आर्यन बोभाटे या विद्यार्थ्यांनी नाझीम शेठ पठाण यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ अर्पण केला तसेच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.नाझीम शेठ पठाण हे सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत असतात. गरजूंना मदतीचा हात देणे, युवकांना प्रोत्साहन देणे तसेच समाजात ऐक्य व बंधुभावाची भावना दृढ करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांच्या कार्यामुळे समाजातील विविध स्तरांतील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. साधेपणाने पण आपुलकीच्या वातावरणात पार पडलेल्या या वाढदिवस सोहळ्याचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला सन्मान हा समाजातील चांगल्या कार्याची दखल घेतल्याचे प्रतीक असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
