नंदी बैलाच्या कवायती व विविध कसरती वर चिमुकली फिदा


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये नंदी बैलाचा खेळ ठीक ठिकाणी होताना दिसतो आहे. सध्या लहान मुलांना अत्याधुनिक मोबाईलचे खेळ मोठ्या प्रमाणात खेळायला मिळत असताना त्यामध्ये मुले अक्षर:: दिवसभर गुंग आहेत त्यातल्या त्यात मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या कारणाने कोणीही वडीलधारी मंडळी बोलली तरी ती मुळीच ऐकायला तयार नाही. मोबाईल ने कितीही मोठ्या प्रमाणात क्रांती केली असली तरी आजही लहान मुलांना नंदीबैलाच्या खेळ कसरतीचे आकर्षण आहे आणि ढाणकी शहरात सुद्धा नंदीबैलाचा खेळ कसरत होत असताना जिथे खेळ होईल तो परिसर लहान चिमुकल्यांनी व्यापून टाकलेला दिसतो आहे.
ढाणकी शहरात सुद्धा निवृत्त तलाठी ज्येष्ठ नागरिक असलेले नारायणराव येल्हेकर यांच्या घरासमोर चौक असलेल्या ठिकाणी सकाळीच नंदी महाराजांचे आगमन झाले व आपल्या कसरती व कौशल्य दाखवायला सुरुवात केली सोबत “डाम डूम डूमाक, डाम डुम डूमाक” वाद्य वाजवणारा त्या नंदीचा मालक सुद्धा त्याच्या दिमतीला होता जीवन जगण्याच्या त्याच्या मालकाच्या धडपडीसाठी नंदी महाराज सुद्धा प्रामाणिकपणे सांगितलेल्या प्रत्येक सूचनेचे पालन करताना दिसत होते. नंदी महाराजांच्या शिंगाला सुंदर अशी सजावट होती शिवाय मोर पिसारा सुद्धा होता. यावेळी माता-भगिनींनी सुद्धा अन्नधान्याच्या स्वरूपात मदत केली व नंदी महाराजांची उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल पूजन करून स्वागत सुद्धा केले. ढोलकी वाजवणाऱ्या व्यक्तीने खेळ करण्याच्या आधीच सांगितलं होतं की जगन्नाथा कोणाला मारायचे नाही असं म्हणल्यानंतर नंदी महाराजांनी सुद्धा तेवढ्याच आदबीने मान डोलवून कोणालाही मारणार नाही असे वचन दिले. लहान मुलांना व जमलेल्या अनेक मंडळींना कमाल या बाबीची वाटली चार पाय आपल्या मालकाच्या अंगावर ठेवून काही क्षण उभे राहत असताना आपल्या मालकाला थोडी सुद्धा जखम इजा त्रास होणार नाही याची काळजी नंदी महाराजांनी घेतली. सगळ्यात वयोवृद्ध व्यक्ती कोण. नंदीला त्या व्यक्तीचे नाव घेतल्यानंतर तो अगदी न चुकता त्या ठिकाणी त्या व्यक्ती जवळ जाऊन उभा टाकतो हे अविलक्षण क्षण लहान मुलांना याचे आश्चर्य वाटत होते. यावेळी लहान मुलांनी सुद्धा या खेळासाठी घरून पालकांनी जी सकाळी खाऊ साठी म्हणून दिलेली रक्कम नंदी महाराजांना बक्षीस म्हणून दिली व नंदीच्या पोटाखालून जाण्याचा आनंद लुटला अंगावर झूल मोठ्या व लहान अशा असंख्य घंटा नंदी महाराजांच्या गळ्यात असल्याकारणाने त्या घंटा लहान मुलांना आकर्षित करून “सांग सांग, भोलानाथ पाऊस पडेल का” या पाठ्यपुस्तकातील गाण्यांची आठवण करून देत असेल म्हणूनच की काय नंदी महाराजांच्या प्रत्येक बारीक-सारीक घडामोडी वर चिमुकल्यांचे विशेष लक्ष होते यावेळी नंदी महाराजांच्या खेळ करणाऱ्या व्यक्तींनी सांगितले की ही लोककला असून लुप्त होत चालली आहे ती चालत आलेली परंपरा टिकावी म्हणून हा खेळ आम्ही करतो आहे येणाऱ्या काळात जर योग्य आमदनी राहिल्यास ही परंपरा आणि महत्त्व टिकेल बैल हा अवतालाच बघण्यात जास्तीत जास्त येतो पण त्याला वाचा नसताना सुद्धा अगदी अचूकपणे इशारे व सांगितलेल्या बाबीचे तंतोतंत पालन करतो यावरून जनावरातील आपल्या मालका प्रती प्रामाणिकता प्रकर्षाने समोर येते पण एवढे सगळे असताना माणूस मात्र एकमेकाला मानव धर्मातून मदतीची व फसलेल्या व्यक्तीला संकटातून काढण्याची भूमिका विसरला की काय याची जाण होते व ही एक शोकांतिका म्हणावी लागेल