
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी जर्नलिस्ट कु.माधुरी दीपक कटकोजवार यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर यांचेशी सल्लामसलत करुन आज ४ फेब्रुवारी ला नियुक्ती पत्र देऊन जाहीर केली आहे. नवनियुक्त युवती जिल्हाध्यक्षा कु.माधुरी कटकोजवार ह्या स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात (सी.एच.बी) प्राध्यापिका म्हणून कार्यरत असुन त्यांनी एम.ए.मास कम्युनिकेशन (मेरीट), एम.ए. हिंदी (गोल्ड मेडल) अशा प्रकारचे उच्च शिक्षण प्राप्त केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माधुरी कटकोजवार यांनी भानापेठ प्रभाग ११ मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या अधिकृत उमेदवार म्हणून तुतारी वाजविणारा माणुस चिन्हावर निवडणूक लढवुण निर्णायक मते घेतली होती हे या ठिकाणी महत्वाचे आहे. या नव्या नियुक्तीमुळे युवक युवती वर्गामध्ये आनंद व्यक्त केल्या जात असुन कु.माधुरीताईंवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
