
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल येथे रविवार दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या योग दिनाला राळेगाव तालुका योग फिटनेस ट्रेनर व प्रशिक्षक म्हणून डॉ. बी. एम. कोकरे उपस्थित होते.
शाळेत मागील अकरा वर्षा पासून ते योग दिना निमित्त शाळेत येऊन विद्यार्थ्यांना योग अभ्यासाचे प्रात्यक्षिक देण्याची अविरत सेवा देत आहे.तसेच योग दीना निमित्त विद्यार्थ्यांना जीवनात योगाचे महत्वाचे स्थान का आहे. आणि निरोगी जीवनासाठी नियमित योगासने का करणे आवश्यक या बद्दल सर्व माहिती उपस्थित योग ट्रेनर व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली …यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षक, प्राध्यापक मोठ्या संख्येने योग दिनानिमित्त उपस्थित होते.
