
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
केंद्र शासनाने यंदाही एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्याच्या लागवडीला परवानगी न दिल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बियाण्यांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत संघटनेने १७ जून रोजी राळेगाव तालुक्यातील खडकी येथे प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्याची प्रतिकात्मक लागवड करण्यात आली.
शेतकऱ्याना २००८ पासून तणनाशक-प्रतिरोधक तंत्रज्ञान असलेले HTBT कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. मात्र, आजपर्यंत या तंत्रज्ञानाला अधिकृत मान्यता मिळालेली नसल्याने शेतकरी आधुनिक कृषी तंत्रज्ञानापासून वंचित राहत असल्याचा दावा तंत्रज्ञान मेळाव्यात करण्यात आला केला.
या निषेधाचा पहिला टप्पा म्हणून शेतकरी संघटनेने १० जून रोजी गुजरात सीमेवरील नंदुरबार येथे सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान गुजरातमधून प्रतिबंधित HTBT बियाणे महाराष्ट्रात आणलेआणी शेतकरी संघटनेकडून
आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून १७ जून रोजी दुपारी १२ वाजता खडकी (ता. राळेगाव) येथील राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात शाषणाची बंदी झुगारून ‘प्रतिबंधित बियाण्याची लागवड’ करण्यात आली यावेळी झालेल्या तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळाव्यात HTBT का आहे.शेतकरी संघटनेच्या मते, शेतकऱ्यांना कोणते बियाणे वापरायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. शासनाने नवीन कृषी तंत्रज्ञानावर निर्बंध घालण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी संघटनेची मागणी आहे. यावेळी रिधोरा येथील शेतकरी अतुल गोहकार, वाई येथील ओंकार काळे,यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला तर एच टी बी टी बियाणे तंत्रज्ञान शेतकऱ्यांन पर्यन्त पोहचविणे हे देशभक्ती आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बियाणे पोचवीत असताना कृषी विभागाच्या कार्यवाहीला बळी पडलेले प्रेमानंद डाखरे यांचा सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप, ललित बहाळे, अनिल घनवट, प्रज्ञाताई बापट, सीमाताई नरोडे,विजय निवल, मिलिंद दामले, दीपक आनंदवार यांनी मार्गदर्शन केले यावेळी , गजानन पारखी, सतीश देशमुख, दीपक आनंदवार, चंद्रशेखर देशमुख, दशरत पाटील, आशिष मुसळे, हिम्मतराव देशमुख बबनराव चौधरी, अक्षय महाजन, गिरीष तुरके, मोहनराव चौधरी गोपाल भोयर,कीशोर झोटींग, निलेश डवरे, दशरथ काळे, गोपाल, नांदुरकर, मारुतराव बावणे, भास्कर पाटील, गजानन कोल्हे, विठ्ठल खोंडे, देविदास काळे, रुपेश बागमार, राजेंद्र येपारी, मधुकर बैलमारे, प्रेमानंद डाखरे यांच्यासह राज्यातील विविध पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी ऊपस्थीत होते यावेळी कृषी विभागाचे अधिकारी ऊपस्थीत होते परंतु कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही याबाबत कृषी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता पाहिजे त्या प्रमाणात नमुन्याकरता बियाणे मिळू शकले नाही असे सांगितले यावेळी ठाणेदार बोरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बदोबस्त होता
