
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
*
आदिवासी समाजातील ” हृदय सम्राट ” लोक नेते स्व.बाबुराव जी मडावी साहेब यांच्या सारखे, समतावादी, आणि समाजवादी, त्यागी आणि कर्तुत्ववान व्यक्तीमत्व आदिवासी समाजात दुसरे होणे नाही. त्यांच्या कडे आदिवासी समाजाबद्दल दृरदृष्टी होती. असे स्पष्ट विचार मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी ” आदिवासी विचार मंथन सभेत व्यक्त केले.* *स्वर्गीय बाबुराव जी मडावी याच्या स्मृतीदिनानिमित्त ” विचार मंथन सभा ” आयोजित केली होती. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा श्रावण जी पाडसेनेकुन साहेब , अध्यक्ष कोलाम समाज विचार मंच यवतमाळ हे होते तर प्रमुख मार्गदर्शक मा. प्रा. मनोहर जी मेश्राम हे होते. आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते मा. नंदु भाऊ कुडमथे माजी सभापती नगर परिषद यवतमाळ यांच्या उपस्थितीत अतिशय महत्त्वाच्या विषयावर ” विचार मंथन सभा ” आदिवासी सांस्कृतिक भवन येथे यशस्वी संपन्न झाली.* *कार्यक्रमाचे आयोजन ग्राम स्वराज्य महामंच आणि आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून झाले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. डॉ. विलास कनाके साहेब करत असताना त्यांनी सांगितले की आदिवासी समाजातील लोकनेते स्वर्गीय बाबुराव जी मडावी यांनी आदिवासी विकास परीषद निर्माण केली . गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार त्याना मानतात. त्यांनी आदिवासी समाजातील लोकांना आदिवासी चा सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन जपला. त्यांनी समाजात कधी ही भेदभाव कीवा गट तट निर्माण केले नाही परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही. आज आदिवासी समाजात गटा तटाचे राजकारण दिसते याचे दुःख तमाम आदिवासी समाजातील लोकांना वाटते. हे जातियवादी द्वेष थांबला पाहिजे असं स्पष्ट मत मा डॉ विलास कनाके साहेब यांनी प्रास्ताविक मधुन मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्षिय भाषनातुध मा श्रावण पाडसेनेकुन साहेब यांनी कोलामी भाषेतून सर्व आदिवासी समाजातील लोकांना समतेचा संदेश दिला. त्यांनी आयोजकांचे मन भरुन कौतुक केले. मधुसूदन कोवे गुरुजी ला तर सांगितले की तुम्ही सर्व लोकांना मार्गदर्शन करताना आम्ही पाहतो आहे. तुम्ही माझ्या सारख्या मानसाला कार्यक्रमाचे अध्यक्ष बनविले मी तुमचा ॠणी आहे स्पष्ट मत व्यक्त केले.* *सर्व मान्यवरांनी अतिशय महत्त्वाच्या विषयावर विचार मंथन केले या कार्यक्रमात सहभागी आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते कर्मचारी महिला पुरुष बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते . यात प्रामुख्याने सहकार्याची भूमिका मा. मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच, मा डॉ विलास कनाके साहेब, मा प्रा मनोहर जी मेश्राम मा श्रावण पाडसेनेकुन साहेब, मा नंदु भाऊ कुडमथे, बंडू जी पंधरे, प्रदिप कुमरे वसंतराव मडावी महादेव कोडापे, देवानंद मडावी आले साहेब, प्रल्हाद काळे साहेब, विश्वास कुभेकर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. आभार प्रदर्शन मा वसंतराव मडावी साहेब यांनी केले.*
