
सहसंपादक: रामभाऊ भोयर
एनसीईआरटी नवी दिल्ली भारत सरकार व प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर व्दारा पुरस्कृत शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ व श्री लखाजी महाराज मंडळ झाडगाव श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने ५१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दिनांक २८ , २९ डिसेंबर २०२३ ला करण्यात आले आहे . या प्रदर्शनी चा मुख्य विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आहे. श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे आयोजन स्थळ आहे. हे वर्ष यवतमाळ जिल्ह्यातील विज्ञान .प्रदर्शनीचे ५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आहे हे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजनाचा बहुमान तब्बल २३ वर्षानी राळेगांव तालुक्याला मिळाला आहे . या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून नामदार संजय राठोड पालक मंत्री यवतमाळ जिल्हा तथा मृद व जल संधारण मंत्री यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ वजाहत मिर्झा, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड औरंगाबाद, खा.श्रीमती भावनाताई गवळी यवतमाळ वाशिम मतदार संघ, खा.हेमंत पाटील खासदार हिंगोली हे राहणार असून विशेष अतिथी म्हणून अँड.निलय नाईक विधान परिषद सदस्य, आ. किरण नाईक विधान परिषद सदस्य, आ .धिरज लिंगाडे विधान परिषद सदस्य, आ प्रा. डॉ. अशोक उईके राळेगाव मतदार संघ, मदन येरावार आमदार यवतमाळ,.संजीव रेड्डी बोदकुरवार आमदार वणी, आ. संदीप धुर्वे आमदार केळापूर, आ नामदेवराव ससाणे, आमदार उमरखेड, आ.ईंद्रनिल नाईक आमदार पुसद, हे राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष. डॉ.श्री पंकज आशिया भा.प्र.से. जिल्हाधिकारी यवतमाळ,तर अतिथी म्हणून मा. डॉ.मेंनाक पोष मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ ,.श्रीमती याशनी नागराजन मॅडम सहा.जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी ए आ वि प्रकल्प पांढरकवडा डॉ.शिवलिंग पटवे ,शिक्षण उपसंचालक अमरावती डॉ .जयश्री राऊत शिक्षणाधिकारी माध्यमिक , किशोर पागोरे शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रदीप गोडे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ प्रशांत गावंडे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ , डॉ.शिवानंद गुंडे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, नीता गावंडे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग, सरला देवतळे गटशिक्षणाधिकारी राळेगाव योगेश डाफ सहायक शिक्षण उपनिरीक्षक जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक माध्यमिक, चित्तरंजन कोल्हे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक, आशिष कोल्हे उपाध्यक्ष , रोशन कोल्हे सचिव, मुख्याध्यापक विलास निमरड हे राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून . दिलीपराव कोल्हे अध्यक्ष श्री लखाजी महाराज मंडळ झाडगाव यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून तर बक्षीस वितरण समारंभ २८ डिसेंबर शुक्रवारला दुपारी तीन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या विज्ञान प्रदर्शनीत जिल्ह्यातील अनेक नामवंत शाळातील बाल वैज्ञानिक या प्रदर्शनात प्रयोगाचे सादरीकरण करणार असून जिल्ह्यातील सर्वच माध्यमांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनी दाखविण्यासाठी आणावे ही विज्ञान प्रदर्शनी सर्वांसाठी खुली असल्याने सर्वांना प्रदर्शन पाहता येईल असे आयोजन समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे . * यवतमाळ जिल्हा परीषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ जयश्री राऊत व उपशिक्षणाधिकारी प्रदिप गोडे शिक्षण विभागातील अधिकारी यांनी आयोजन समिती मधील सर्वच समिती प्रमुख सदस्य यांची बैठक घेऊन जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी यशस्वी करावी असे सांगीतले.
