आदिवासी गोंड-गोवारी समाज संघटना विहिरगांव च्या वतीने भव्य शाहीर गजानन ठाकरे यांचा कलापथक व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना विहिरगांव च्या वतीने नागपूर इथे शाहिद झालेल्या
114 शहिद गोवारी श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 23 नोव्हेंबर 1994 ला नागपूर मध्ये टी पॉईंटवर झालेल्या चेंगराचेंगरीत 114 गोवारी बांधव शहिद झाले होते. त्या दुर्दैवी घटनेला 30 वर्ष पूर्ण झाले या निमित्त विहिरगांव येथील गोवारी शहिद स्मारक परिसरात श्रध्दांजली घेण्यात आली. फुलांनी सजविलेल्या शहिद गोवारी स्मारकाला अभिवादन करून आदिवासी गोंड गोवारी कलापथक मंडळ वाठोडा यांचा कलापथक व समाज प्रबोधनाचा शाहीर गजानन ठाकरे यांचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमाला परिसरातील खैरगाव वेडशी एकुर्ली रिधोरा धुमका चाचोरा असे भक्कम गर्दी लोकांची दिसून आली होती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, झित्रुजी कोडापे,डोमाजी कोडापे,वसंता कुळसंगे,विशाल मडावी, वैशाली खगारे,(ग्रा.प.स.) प्रतिभा खंगारे ,(ग्रा.प.स.) स्मिता परचाके,(ग्रा.प.स.) विमल चांदेकर,(ग्रा.प.स.)
अरुण खंगारे,(ग्रा.प.स.) पुरुषोत्तम घुगरे,अनिल राऊत,छोटू आत्राम,अनिल खंगारे, तसेच उदघाटक:-सि. एस.मेश्राम,(सरपंच) कपिल वगारहांडे(उपसरपंच) महेश भाऊ परचाके, पांडुरंग भेदूरकर,रुपेश चचाने,(पटवारी) विनोद लुंगसे,(पो. पाटील) विशाल उईके उपस्तित होते या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद नेहारे,कपिल वगारहांडे,निलेश राऊत नितीन वगारहांडे विठ्ठल चामलाटे तसेच अरविंद कोडापे(पत्रकार)रजत चांदेकर(पत्रकार) अतुल येरकाडे,अनिरुद्ध झाडें,हिम्मत कुळसंगे,इंद्रपाल राऊत,सागर राठोडा मारोती घुगरे,विनोद नेहारे रोशन नेहारे मयूर मूर्खे निलेश चचाने मंगेश राऊत योगेश राऊत व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तित होते