
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने त्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी दिं ४ एप्रिल २०२२ रोज सोमवारपासून बेमुदत संप पुकारला पुकारला असून संपाचा दुसरा दिवस आहे.
महसूल विभागातील मागील दोन वर्षांपासून रखडलेली अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात होणारी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यासह नायब तहसीलदाराचा राज्यस्तरीय संवर्ग रद्द करने अव्वल कारकून प्रवर्गातून नायब तहसीलदार पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे आदी मागण्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यानंतर शासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी दिं४ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे त्यानुसार उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने कामकाज प्रभावित झाले आहेत दरम्यान प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास संप मागे न घेण्याचा निर्धार यावेळी महसूल कर्मचारी यांनी बोलून दाखविला आहे यापूर्वी महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने निदर्शने काळ्या फिती लावून कामकाज करणे व एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता त्यानंतर या मागणी पूर्ण न झाल्यामुळे बेमुदत संप पुकारण्यात आला असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले यावेळी संपात गजानन बलांद्रे, बी के भोरे,राजू राजू येंडे,प्रवीण कोल्हे गजानन खोकले, संजय झाडे, प्रिया माकोडे, विजय मडावी, मुनेश्वर कुळसंगे, विलास गाडे आदि महसूल कर्मचारी या संपात सहभागी झाले.
