
सहसंपादक: रामभाऊ भोयर
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दिनांक 21/1/2026 रोज बुधवारला ठीक 12 वाजता शिक्षणाधिकारी माध्यमिक यवतमाळ येथे शिक्षकांच्या समस्या निवारण सभेची सुरवात करण्यात आली या कार्यक्रमात सुरवातीला कार्यालयातर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी यवतमाळ पागोरे यांनी आमदार सुधाकर अडबाले सर यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.त्यानंतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा, मेडिकल बिल, अंतिम प्रदान,जि.पी.एफ च्या पावत्या या सोबतच इतरही समस्यांवर चर्चा करून शिक्षण विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून सकारात्मक उत्तरे वदवून घेण्यात आली. काही अपूर्ण कामासाठी संबंधित विभागाला कामे पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यात आला.. या सभेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 57 वैद्यकीय प्रस्ताव वेळीच मंजूर करून घेतले.सोबतच प्रलंबित वरीष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव, मुख्याध्यापक मान्यता वेळीच मंजूर करून संबंधित शिक्षकांना देण्यात आले.त्यात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन सर व यवतमाळ जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर यांनी दिलेल्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा केली.त्यापैकी अनेक प्रश्न सोडविण्यात आले. आजपर्यंत न मिळालेल्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या 31 जानेवारी पर्यंत न मिळाल्यास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी 1 एप्रिलपासून कार्यालयासमोर बसेल असे आमदार महोदयांच्या परवानगीने कार्यालयाला सांगितले.या सभेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर, प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर, अमरावती विभागाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू सर जिल्हा अध्यक्ष पवन बन सर जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर यांच्या सह शिक्षणाधिकारी पागोरे साहेब, उपशिक्षणाधिकारी गोडे साहेब डाफ साहेब, नाईक मॅडम वेतनपथक अधिक्षक वानखेडे साहेब सोबतच संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या सभेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे वर्धा कार्यवाह श्री सालंकार सर, महामंडळाचे सदस्य आनंद मेश्राम सर श्रावणसिंग वडते जिल्हा उपाध्यक्ष, सुरेंद्र कडू मुरलीधर धनरे सर, मनोज जिरापुरे श्याम बोडे अशोक आकुलवार विजय विसपुते संतोष हेडाऊ मंगला वडतकर गुलाब सोनोने श्रिकांत अंदुरकर साहेबराव धात्रक, भुमन्ना भुमकंटीवार भुपेद्र देरकर उमाकांत राठोड नागोराव चौधरी डॉ.ईर्शाद खान , इमरान सर विनोद मंगाम प्रभू गुंडेवाड नितीन गावंडे यांच्या सह अनेक पदाधिकारी, समस्याग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यानंतर आमदार महोदयांनी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक संचालक नगराळे साहेबांच्या उपस्थितीत तक्रार निवारण सभा पाच वाजेपर्यंत घेऊन समाजकल्याण अंतर्गत चालणाऱ्या निवासी शाळेच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर ताबडतोब कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. अशाप्रकारे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले सर यांनी वेळीच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या समस्या सोडवण्यासाठी सभा आयोजित करून अनेक प्रकरणे निकाली काढल्यामुळे माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, समाजकल्याण विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून दिसत होता. याही विभागाने आमदार सुधाकर अडबाले सर व उपस्थित समस्याग्रस्त बांधवांना आश्वासित करून सर्वांचे आभार मानले.
