
सहसंपादक : रामभाऊ भोयर
झरी : तालुक्यातील शिबला (ता. झरी जामणी) येथे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय यवतमाळ व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (DMHP) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मानसिक आरोग्य रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन मंगळवार, दि. 20 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले होते. हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
शिबिराचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष एस. ढोले, डॉ. मोहन गोडाम, तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. गणेश इंगोले (मेझर) यांची उपस्थिती होती.
शिबिरामध्ये मानसिक तणाव, नैराश्य, झोपेचे विकार, फिट्स (अपस्मार), OCD, मूड डिसऑर्डर, व्यसनाधीनता तसेच गर्भावस्था व प्रसूतीपूर्व–नंतर महिलांमध्ये उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांवर मोफत तपासणी, समुपदेशन व औषधोपचार करण्यात आले. अनेक रुग्णांना तत्काळ उपचार देण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. रजेश गोडाम, डॉ. ज्योती मगर, प्राथमिक आरोग्य केंद्र शिबला येथील आरोग्य कर्मचारी, परिचारिका तसेच आशा कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.
माजीजिल्हा परिषद सदस्य धर्माजी हनुमंत आत्राम
“मानसिक आरोग्य हा दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांसाठी अशा मोफत शिबिरांची नितांत गरज आहे. शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मानसिक आजारांबाबत असलेली भीती व गैरसमज दूर करावेत.”
