
सहसंपादक -रामभाऊ भोयर
आदर्श मंडळ राळेगाव च्या सदस्यांनी शहरामध्ये वेड्या सारखा फिरत असलेल्या बादशहा ला यवतमाळ येथील नंददीप फाउंडेशन येथे उपचार व देखभालीसाठी काही महिन्यांपूर्वी भरती केले.
येथे बादशहा वर उपचार व त्याची चांगल्या पद्धतीने देखभाल करण्यात आल्याने तो आज पुर्णतः बरा झाला आणि बादशाहा ला आज त्याचा परिवार मिळाला.
आदर्श मंडळाचे प्रमुख तथा राळेगाव समाचार चे संपादक फिरोज लाखाणी यांच्या मार्गदर्शनात मंडळाचे अमोल पंडित, वैभव बोभाटे, अंकीत बोटरे सह इतर सदस्यांनी बादशाहाला यवतमाळ येथे पोहचविले त्यामुळे बादशाहाच्या परिवाराने आदर्श मंडळाचे व नंददीप फाउंडेशन यवतमाळ यांचे आभार मानले.
सातत्याने समाजोपयोगी उपक्रम आदर्श मंडळाच्या वतीने राबविण्यात येतात.
या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.