
सविस्तर वृत्त
नगरपालिकेच्या निष्काळजीमुळे ओम नमो नगर डी मार्ट जवळ वडगाव येथील रोडवरील मुरूम पावसामुळे गेलावाहून त्यामुळे रोड चिखलमय झाला.नगरपालिकेने मुरूम टाकल्यानंतर पसरून दिला असता तर येथील नागरिकांचे हाल झाले नसते त्यामुळे येथील नागरिकांनी. राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख यांची भेट घेऊन त्यांना या रोडची परिस्थिती सांगितली संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख यांनी रोडची पाहणी असता टाकलेला मुरूम सर्व पावसामुळे अस्ताव्यस्त झाला होता ओम नमो नगरा मधले वार्ड मेंबर नगरसेवक श्री देवकते गेले पाच वर्षे आधी या नागरिकांनी त्यांना निवडून दिले व ते नगरसेवक बनले नगरसेवक बनल्यानंतर या वार्ड मधल्या नागरिकांनी ह्या नगराविषयी भरपूर समस्या मांडल्या ह्या नगरसेवक साहेबांनी एकही काम केले नाही असा नगरसेवक काय कामाचा असे मत राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख यांनी व्यक्त केले जो नगरसेवक वार्ड ची दखल घेऊ शकत नाही अशा वॉर्ड मेंबर चा धिक्कार असो अशी वार्ड मधल्या नागरिकांनी नगरसेवक देवकते यांच्यावर. पुढल्या इलेक्शनला बहिष्कार. मत नागरिकांनी व्यक्त केले
राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्ते त्यांनी या रोडवर श्रमदानातून मुरूम टाकण्याचे काम आज चालू केले या नगरातल्या लोकांना दिलासा दिला त्यामुळे या नगरातील लोकांनी राष्ट्रसंत विचार मन संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख व कार्यकर्ते
श्री राजू आडे श्री प्रफुल देवतळे श्री सुनील परचाके
श्री अमोल भाऊ पडघान
श्री अशोक राठोड. आणि श्री.रामाभाऊ राठोड त्या सर्वांनी श्रमदान करून या रोडवर मुरूम टाकण्याचे काम केले
त्यामुळे नागरिकांनी यांचे आभार मानले.
