
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
यावर्षी अतिवृष्टीने कापसाचा हंगाम लांबला दिवाळीपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांची सीतादही झाली नाही त्यामुळे शेतकऱ्याकडे कापुसच नाही तसेच नुकतेच दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसेही मिळाले त्यामुळे शेतकरी कापूस विकायला गेलाच नाही परिणामी जिनिंगमध्ये कापूस विक्रीसाठी न आल्याने जिनिंग व्यावसायिक कापूस विक्रीसाठी येण्याची वाट पाहात आहे।।।।। अलीकडच्या काळात राळेगाव ही कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाते इथे एका हंगामात दहा लाख क्विंटलच्या वरती कापूस खरेदी केल्या जातो शहरात सात जिनिंग प्रेसिंग आहे तर तालुक्यात 11 जिनिंग प्रेसिंग आहे दरवर्षी दिवाळीच्या अगोदर कापसाची खरेदी सुरू होते व पुढेपुढे त्यात मोठी वाढ होत जाते पण यावर्षी दिवाळीपर्यंत कापसाची खरेदीच सुरूच झाली नाही व आताही पाहिजे तसा कापूस जिनिंग मालकाकडे नसल्याने जिनिंगमलक कापूस विक्रीसाठी येण्याची वाट पाहत आहे।।यावर्षी सुरवातीला कपाशीचे पीक चांगले आले होते पण अतिवृष्टीने पिकाचे बरेच नुकसान झाले परतीच्या पावसाने तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचे नुकसान झाले कपाशी खराब झाली कपाशी ही लाल पडत आहे कपशिवर लाल्या रोगाचे आक्रमण झाले आहे अजूनपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांची सितादही झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस आला नाही अतिवृष्टीमुळे यावर्षी कापसाचा हंगाम लांबला त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येणार कारण सुरवातीच्या बॉण्डचा कापूस वजनदार असतो पण अतिवृष्टीमुळे सुरवातीची बॉण्डच पकडली नाही तसेच बीटी कपाशीचा हंगाम हा अतिशय छोटा असतो दोन वेचणीत कपाशीची उलागवाडी होते सध्यस्तीतीत कपाशीची अवस्था ही चांगली नाही तसेच पुढेही ती चांगली होईल अशी सध्यातरी परिस्थिती नाही त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात लक्षणीय घट येणार एवढे निश्चित शेतकऱ्याकडे कापुसच नसल्याने शेतकरी कापूस विक्रीसाठी गेला नाही परिणामी जिनिंगकडे कापूस नाही याशिवाय दिवाळीच्या तोंडावर शेतकरी काही प्रमाणात तरी दिवाळीची गरज भागण्यासाठी कापूस विकतात पण यावर्षी घरी कापुसच नाही तसेच दिवाळीच्या तोंडावर बहुतांश शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले त्यातुन शेतकऱ्यांची दिवाळीची गरज भागली नाही त्यामुळे शेतकऱ्याने कापूस विकण्याचे थांबविले सोबतच कापसाच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे कापसाचे भाव आणखी वाढेल अशी आशा।शेतकऱ्यांना असल्याने शेतकरी पाहिजे त्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी गेला नाही तो थांबला आहे दरवर्षी बाहेर तालुक्यातुन तसेच जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात राळेगाव येथे कापूस विक्रीसाठी यतो यावर्षी त्या प्रमाणात तो ही कापूस विक्रीसाठी न आल्याने जिनिंग मालकाची कापूस विक्री साधय संथ आहे.
