(प्रतिनिधी) शेख रमजान
बिटरगाव (बु.) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. या निकालात वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बिटरगाव (बु.) यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट यश संपादन करत उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयाचा एकूण निकाल समाधानकारक ठरला असून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याच्या जोरावर उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा पुढे चालू ठेवली.
विज्ञान शाखेचा निकाल 98.03 टक्के, तर कला शाखेचा निकाल 80.68 टक्के लागला असून विद्यालयाची एकूण निकाल टक्केवारी 93.66 इतकी नोंदविण्यात आली आहे.
विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी
संस्कृती सुनील बिचेवार – 88.83%
अनिता अविनाश विनकरे – 87.83%
राजवर्धन धनंजय चिचोलकर – 86.00%
कला शाखेतील गुणवंत विद्यार्थी
कु. दीक्षा जितेंद्र पाईकराव – 78.00%
कु. कोमल संजय राठोड – 72.33%
कु. रूपाली ज्ञानेश्वर शेरे – 66.67%
विद्यालयातील शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची नियमित अभ्यासाची सवय आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा उल्लेखनीय निकाल लागला असल्याचे विद्यालय प्रशासनाने सांगितले. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.यामध्ये सर्वात मोठा वाटा शिक्षणाचा असणारे
बंदी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अहिल्यादेवी होळकर स्मारक संस्थेचे सचिव शिक्षण महर्षी स्व. ल. ह. एडतकर सर यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे ग्रामीण व बंदी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. याची उदाहरण म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लागलेला उत्कृष्ट निकाल
विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद, संस्थेचे पदाधिकारी तसेच व्यवस्थापन समिती यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान सिद्ध केले आहे.
सर्व उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे अहिल्यादेवी होळकर स्मारक संस्था पुरसदचे सचिव ॲड. दिलीप एडतकर, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष , पुंजाराम संभाजी डोंगे, संस्थेचे कार्यवाहक अनिल चेंडकाळे, प्राचार्य डी. एम. खर्चे, पर्यवेक्षक कुमारी मंगला गावंडे, प्रा. सुनिल कालबांडे, प्रा. संतोष आंडगे, प्रा. सुनील काळे, प्रा. अमोल माने, नरेंद्र दूधे, प्रा. जगदीश प्रावकर, गजानन निरटवाड तसेच विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक व उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी भविष्यातही परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाची नवी शिखरे गाठावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. विद्यालयाच्या निकालामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
