
येणाऱ्या काळामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होणार आणि विद्यार्थ्याला कागदपत्रे लागणार लगबग सुरू होणार त्या आधीच शासनाने या अभिनयानाचा लाभ देऊन मिळणारी कागदपत्र हे महसूल मंडळातच “ऑन स्पॉट देऊन ” पैसा वेळ या खर्चिक बाबीला आळा बसावा म्हणून ढाणकी शहरातील कस्तुरबा गांधी कन्या शाळा येथे महाराजस्व शिबीर अभियान दि. 29 एप्रिल बुधवार रोजी संपन्न झाले यावेळी अनेक कागदपत्रांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला उमरखेड महागाव विधानसभेचे आ. किसनराव वानखेडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच उमरखेडचे तहसीलदार आर.यु. सुरडकर मंडळ अधिकारी एस. एम. वाघमारे. नायब तहसीलदार आर. एन. पंडित ढाणकी नगरपंचायत नगराध्यक्ष सौ. अर्चना वासमवार, उपनगराध्यक्ष दत्तदिगंबर वानखेडे, रोहित वर्मा, मल्हार चंद्रे, बळवंतराव नाईक, बाळासाहेब चंद्रे, ग्राम महसूल अधिकारी संतोष जगताप, बी. बी.पावडे, इंगळे, राहुल भोजने, अक्षय शिंदे, नगरपंचायतचे राजू दवणे यांची उपस्थिती होती.
यावेळी अर्जदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून महसूल मंडळ ढाणकीच्यावतीने शामियाना टाकण्यात आला होता. बसण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली होती कुलरची व्यवस्था सुद्धा असल्यामुळे या ठिकाणी गर्मीत सुद्धा अर्जदारांना दिलासा मिळाला. यावेळी अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती सर्व विभागांनी समन्वय साधून नागरिकांना शासनाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला या अभियानाच्या मोहिमेतून विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचण्यात बऱ्यापैकी यश आल्याचे दिसून आलं. श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना यावेळी लाभ देण्यात आला उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास, अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाबीला अनुसरून लागणाऱ्या कागदपत्रांचे या वेळेस अर्जदारांनी अर्ज केले. यावेळी आलेल्या अर्जदारांना ढाणकी येथील महसूल मंडळातर्फे अल्प अहाराची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. यावेळी आलेल्या अर्जदारांनी थंडगार मठ्याचा लाभ सुद्धा घेतला. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा चोख पणे करण्यात आली होती. अभिलाष गायकवाड व सय्यद इबादुल्ला यांनी विशेष मेहनत घेऊन हे शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
शासनाचा एवढा महत्त्वाचा छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचे गांभीर्य सुद्धा विद्युत वितरण कंपनीला कळले नाही बराच वेळ या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यावेळी आमदार महोदय तहसीलदारांची सुद्धा उपस्थिती होती पण विद्युत वितरण कंपनीने आपल्या खेळखंडोबाची अखंडित प्रक्रिया परंपरा या ठिकाणी सुद्धा चालू ठेवली. पण प्रशासनाने यावेळी जनरेटरची व्यवस्था केली होती व प्रशासनाच्या कामात कुठल्याही खंड न पडू देण्याची दक्षता घेतली होती हे विशेष.
