
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी हिशोब अपूर्ण आणि
दहा वर्षापासून हिशोब चिठ्ठ्यांचे वाटप नाही.याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी पागोरे साहेब यांची प्रत्यक्ष शिष्टमंडळाने भेट घेतली आणि22 जून पर्यंत भविष्य निर्वाह निधी हिशोब पूर्ण करून शिक्षकांच्या हातात हिशोब चिठ्ठ्या न मिळाल्यास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ 25 तारखेपासून बेमूदत ठिय्या आंदोलन करेल असा इशारा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे
यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन सर जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर यांनी दिला .
यवतमाळ जिल्ह्यामध्ये असणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील भविष्य निर्वाह निधी खातेधारक शिक्षक यांची संख्या हजारो मध्ये असताना जिल्ह्यातील 700 ते 800 माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांचे भविष्य निर्वाह निधी हिशोब गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून अपूर्ण आहे .
हा हिशोब पूर्ण करून शिक्षकांना आपल्या भविष्यासाठी राखून ठेवलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये किती पैसे शिल्लक आहे हे माहिती करण्यासाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या हिशोबिट्ट्या गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून अनेक शाळांतील शिक्षकांना मिळाल्या नाही
त्यामुळे मुलांचे शिक्षण ,वैद्यकीय समस्या ,मुलांचे लग्न यासारख्या अडचणीच्या प्रसंगी उपयोगी येणारे हे पैसे शिक्षकांना वेळेवर मिळत नाही,
या प्रश्नासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने अनेक वेळा तत्कालीन वेतन पथक अधीक्षक ,शिक्षण अधिकारी माध्यमिक ,शिक्षण उपसंचालक अमरावती यांना निवेदन दिले
त्याचबरोबर संघटनेच्या अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या सभांमध्ये हा विषय मांडला प्रत्येक वेळेस अधिकाऱ्यांनी आश्वासने दिली व पुढील तारीख देण्यात आली परंतु ही आश्वासने पाळल्या गेली नाही तत्कालीन अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले
त्यामुळे गेल्या पंधरा वर्षापासून अनेक शाळांचे भविष्य निर्वाह निधी हिशोब पूर्ण झाले नाही
त्याचबरोबर सेवानिवृत्त झाल्यानंतर भविष्यासाठी राखून ठेवलेली ही रक्कम भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदानच्या स्वरूपात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्काळ मिळायला पाहिजे परंतु हिशोब पूर्ण न झाल्यामुळे आठ महिन्यांपासून अनेक सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यासाठी राखून ठेवलेली ही रक्कम मिळाली नाही यासाठी संघटनेने अनेक वेळा प्रयत्न केले परंतु तत्कालीन अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही
त्यामुळे यासाठीची अंतिम लढाई म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने दिनांक 8 जूनला वेतन पथक अधीक्षक ,माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक निवेदन दिले याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन बन जिल्हा कार्यवाह राम कृष्ण जिवतोडे , शिक्षक महामंडळाचे सदस्य आनंद मेश्राम,कार्याध्यक्ष विजय खरोडे ,उपाध्यक्ष श्रावणसिंग वडते संतोष हेडाऊ, विलास वाघमारे सर मुख्याध्यापक संघाचे भुमन्ना बोमकंटीवार सर यांच्या सह अनेक पदाधिकारी व समस्याग्रस्त बंधू भगिनी उपस्थित होते . त्यावेळी
निवेदनानुसार22 जून पर्यंत सर्व शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी हिशोब चिठ्ठ्या मिळाल्या पाहिजे व सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचे अंतिम प्रदान प्रस्ताव त्यांना मिळाले पाहिजे
अन्यथा 25 जून पासून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माननीय शिक्षक आमदार विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकरराव अडबाले सर,माननीय माजी शिक्षक आमदार व्हि यू डायगव्हाणे सर, संघटनेचे अध्यक्ष अरविंद देशमुख सर, प्रांतिक सदस्य दिलीप कडू सर,यांच्या नेतृत्वात दिं 25 जून पासून जोपर्यंत प्रत्येक शिक्षकांच्या हातात त्यांच्या भविष्य निर्वाह निधी हिशोब चिठ्ठ्या मिळत नाही तोपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे
या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर बंधू-भगिनी सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावणसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
