
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
शासनाने डीएपी युरिया वगळता सर्व खतांचे भाव वाढवले डीएपी युरिया खतांचे भाव तसेच ठेवले डीएपी युरिया खताचे भाव न वाढल्याने व त्याचीच मागणी अधिक राहत असल्याने येत्या हंगामामध्ये या खताचा तुटवडा राहू शकतो पण इतर खतांची मात्र टंचाई भासणार नाही असे सध्यातरी चित्र आहे शासनाने डीएपी युरिया वगळता 15 15 15, एमओपी ,20 20 0 13 आदी खतांच्या दरामध्ये बरीच वाढ केलेली आहेत त्यामुळे हे खत वाढीव दरामध्ये उपलब्ध होणार आहेत सध्य स्थितीमध्ये वर्षभर लागणाऱ्या एकूण खताच्या पन्नास टक्के खत कृषी केंद्र चालकांना मिळालेले आहेत 20 टक्के खत ही बफर मध्ये आहे हे खत शासकीय गोदामा मध्ये असते गरज पडल्यावर ती खते कृषी केंद्र चालकांना दिली जाते राहलेला 30%खताचा माल हा वर्षभर शेतकऱ्यांना दिला जाईल युरिया व डीएपी वाटपामध्ये कृषी केंद्र चालकांची यावेळी बरीच दमछाक होणार आहेत कारण शासनाच्या निर्देशानुसार एकरी एक डीएपी व युरियाची बँग शेतकऱ्यांना द्यायची आहे तसेच दहा बॅगच्या वरती कोणालाही डीएपी युरिया द्यायचा नाही असे शासनाचे निर्देश आहे ज्या शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात शेती आहेत त्याला जास्तीत जास्त दहा बॅग मिळणार आहेत त्यामुळे अशा शेतकऱ्यांची पंचाइत होणार आहे खतांमध्ये सर्वाधिक शेतकरी डीएपी व युरिया ही खते देतात यावेळेस एकरी एकच बॅग मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाविषयी नाराजी आहे सरकार सांगते की लिंकिंग करू नका पण डीएपी व युरिया वरती मात्र लिंकिंग हे असतेच कंपन्या लिंकिंगचाच माल कृषी केंद्र चालकांना देतात त्यामुळे कृषी केंद्र चालकांना ते शेतकऱ्यांना द्यावे लागते सरकार कितीही सांगत असले की लिंकिंगचे खत घेऊ नका पण सरकार कंपन्या वरती मात्र असे निर्बंध आणत नाही तोपर्यंत लिंकिंग सुरूच राहणार आहेत युरिया डीएपी साठी शेतकऱ्यांचा सातबारा हा लागणार आहेत सातबारा व्यतिरिक्त इतर कुठलेही डॉक्युमेंट मागितले जाणार नाही केवळ सातबारा पाहून शेतकऱ्याला डीएपी व युरियाचे खत मिळेल
