
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
साकोली जवळ असलेल्या आलेबेदर येथे बौद्ध समाज सडक अर्जुनी द्वारा आयोजित दहा दिवशीय श्रामनेर शिबिर येथील श्रीरत्न बौद्ध विहार येथे घेण्यात आले नवीन बौद्ध उपासकांना श्रामनेर दीक्षा दिल्यानंतर त्या नवीन बौद्ध भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जवळपास 35 गावांमध्ये भ्रमण करून बुद्धाचा धम्म काय आहे ते स्वतः समजून घेतले व दुसऱ्यांना सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न केला
या सामनेर भंतेंचे मार्गदर्शक म्हणून भंते सिरी शिवली, भंते बुद्धप्रिय नागपूर, भंते नागसेन हे होते त्यांनी योग्य ठिकाणी मार्गदर्शन व विविध माहिती देण्याचा प्रयत्न केला
ठीक ठिकाणी त्यांनी शांती मार्च काढला त्यामध्ये 35 गावांमध्ये शांती मार्च काढल्यानंतर दिनांक 18 मे तारखेला साकोली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे धम्मदेशना झाली व त्यानंतर 19 तारखेला साकोली येथील बौद्ध विहारातून आलेबेदर येथील त्रिरत्न बौद्ध विहारांमध्ये समापन करण्यात आले या दहा दिवसांमध्ये श्रामनेर यांना विविध प्रकारच्या बौद्ध धम्माचा ज्ञान प्राप्त झाला त्या ज्ञानाचा उपयोग ते समाजासाठी करणार आहेत धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे आद्य कर्तव्य असून त्याचा चांगला प्रकारे उपयोग होणार आहेत या कार्यक्रमांमध्ये यशस्वी करण्याकरिता तालुका सचिव पुरुषोत्तम रामटेके, आशिष राऊत, रोहित जनबंधू, बौद्ध रामटेके, अश्विन लांजेवार, ठाणेराव वैद्य ,रजनीश मेश्राम, रजनीश पंचभाई ,राजरत्न मेश्राम ,राजकुमार मेश्राम,, तनुजा नागदेवे, कोकिळा रामटेके,शामराव बडोले, रेखाताई बडोले ,चंद्रकांत मेश्राम , सुदेशना राऊत, मीनाताई राऊत, सुभाष टेंभुर्ण, प्रज्ञा दिरबुडे ,अशोक रंगारी, दीपक साखरे, सुरेंद्र कोचे, बोदले सर, अरविंद राऊत, सामाजिक कार्यकर्ते आर व्हि मेश्राम, अनिल मेश्राम, अमोल टेंभुर्ण, प्रतिमा राऊत, गीता खंडारे व इतर बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते
