राळेगाव येथीलउद्धवसाहेब ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याला जनतेचा भरघोस प्रतिसाद

सहसंपादक : रामभाऊ भोयर

उद्धव ठाकरे बोलले 20 मिनिट 42 सेकंद अबकी बार भाजपा तडीपार उद्धव ठाकरेंचा नारा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जनसंवाद सभा राळेगाव येथे गांधी ले आऊट च्या मैदानावर संपन्न झाली या सभेला वीस हजाराच्या वर लोक भारघोस जनसमुदाय उपस्थित होता या सभेत उद्धव ठाकरे हे वीस मिनिट 42 सेकंद बोलले आपल्या या भाषणात त्यांनी मोदी सरकार व राज्य सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.महिलांना तुम्ही जेवलात का? या प्रश्नांनी सभेची सुरुवात केली कारण मी देखील सकाळपासून जेवलो नाही अशा प्रकारची भावनिक साथ उद्धव ठाकरे यांनी महिलांना घातली आपण उपाशी राहून या सभेला आले असे भाग्य फार कमी लोकांना लाभते त्यातला मी एक भाग्यवान आहोत, अशा प्रकारचे भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी घातली.आपल्या देशातील शेतकरी हा प्रामाणिक असून तो प्रामाणिकपणे आपल्या शेतात कष्ट करतो परंतु आपल्या उत्पादित मालाला भाव मागतो हा त्याचा अधिकार असून केंद्र सरकार मात्र अशा या प्रामाणिक शेतकऱ्यावर लाठी चार्ज, पाण्याची फवारे त्यांच्या वाट्यात काटेरी कुंपण टाकून त्यांच्यावर दडपशाही करण्याचे काम करत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सरकार हे भ्रष्टाचाराला साथ देणारे व देशातील प्रामाणिक शेतकऱ्यांवर अत्याचार करणारे सरकार आहे असा आरोप त्यांनी केला. राज्यघटना बदलविण्याकरीता मोदी सर्करकरला 400 पार जागा पाहिजे. परंतु अबकी बार भाजपा तडीपार चा नारा देवून देश रशियाचे पुतीन सरकारचे उदाहरण देऊन मोदी सरकारला 400 च्या पार जागा हव्या आहेत म्हणजे नियमबाह्य न्यायमूर्तीची नेमणूक करून या देशाची घटना बदलण्याकरता भाजप सरकारला 400 चे पार जागा हव्या अशी टीका त्यांनी केली शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडताना त्यांनी शेतकऱ्यांचा हमीभावाचा प्रश्न हे सरकार मिटू शकत नाही हे थापाडे सरकार असून शेतकऱ्याला त्यांच्या घरापर्यंत जाऊन बँक कर्ज देईल अशा प्रकारची घोषणा केली होती परंतु आता बँकवाले मात्र शेतकऱ्यांत च्या दारी जाऊन कर्ज वसुली करता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जात असून निवडणुकीच्या आधी संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी व नंतर निवडणूक घ्यावी अशा प्रकारची मागणी उद्धव ठाकरे यांनी सभेत केली, मोदी सरकारने नेहमी यवतमाळच्या उदाहरण देऊन सभेची सुरुवात केली असे ते सांगतात त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की यवतमाळ जिल्ह्याची भाजप सरकारने नेहमीच फसवणूक केली आहे मागच्या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी या गावात चाय पे चर्चा वर मोदी आले होते तेथे त्यांनी कलावती नामक एका महिलेला आम्ही हे दिले ते दिले अशा प्रकारच्या योजनांचा लाभ आम्हीच दिला अशी म्हटले होते त्या कलावतीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग उद्धव ठाकरे यांनी राळेगावच्या सभेत वाजविले कलावती यांनी म्हटल्याप्रमाणे मला योजनांचा लाभ हा भाजप सरकारने नाही तर राहुल गांधींनी दिला अशा प्रकारची टेप त्यांनी राळेगावच्या सभेत लावून दाखवली. तसेच एक फुल दोन हाफ म्हणजेच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या वर सुधा समाचार घेतला, यवतमाळ येथील सभेवर राज्य शासनाने बारा कोटी रुपये खर्च केला हे बारा कोटी रुपये जनतेची असून त्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ती मदत केली असती तर ती अधिक बरे झाले असते परंतु निवडणुकीच्या तोंडावर जनतेचा पैसा सभेवर खर्च करून भाजप सरकार हे जनतेच्या पैशाची लूट करत आहे म्हणून मी भाजप सरकारला देशाचे लुटारू सरकार असे म्हणतो मागील सरकारच्या योजनांचे नाव बदलविले थापा मारणे यापलीकडे भाजपा सरकार काहीच करत नाही असा आरोपही त्यांनी केला. यवतमाळ जिल्हा हा सदैव शिवसेनेच्या पाठीशी राहिला आहे या जिल्ह्याने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे भावना गवळीवर टीका करताना त्यांनी सांगितले की ज्यांनी पक्षानं आणि जनतेने 25 वर्ष खासदार केले ते पक्षाशी व जनतेशी गद्दारी करून पक्ष सोडून गेले अशा अशा जनतेशी गद्दारी करणाऱ्या भावना गवळीवर त्या खोक्यात बंद झाल्या आता त्यांना गरीब जनतेशी काही देणे घेणे नाही अशी टीका त्यांनी केली. आता दुपारचे दोन वाजले आहेत आता दुपारचे दोन वाजले आहेत तुम्ही उन्हात उभे आहात त्यामुळे आता पुढील निवडणुकीत गद्दारांना उन्हात आणा आणि आपण सावलीत राहू अशा प्रकारची हाक त्यांनी जनतेला घातली,देश्याचे गृहमंत्री याना बोलताना ज्यांना क्रिकेटचे क्रीही समजत नाही असे अमित शहा से चिरंजीव जय शहा क्रिकेटचे अध्यक्ष झाले यावरही उद्धव ठाकरे यांनी खडसुन टीका केली ज्यांना क्रिकेटचे काही देणे घेणे नाही असे जय शहा हे केवळ आम्ही शहाची पुत्र असल्यामुळे त्यांना क्रिकेटचे अध्यक्ष केले क्रिकेटचा अंतिम सामना हा मुंबईच्या ऐवजी गुजरातला नेल्याने मुंबईचे अर्थातच महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे ते केवळ एका राज्याला आर्थिक फायदा करून देणाऱ्या या सरकारांना पुढील निवडणुकीत जागा दाखवून द्या अशी विनवणी त्यांनी यावेळी उपस्थित त्यांना केली.ठाकरे घराणे हे समाजसेवा करणारे घराणे आहे माझे पणजोबा यांनी त्यावेळच्या प्लेग साथीच्या काळात जनतेची सेवा केली तीच सेवा करण्याचे व्रत ठाकरे घराण्याचे आहे आम्ही राजकीय फायदा घेण्यासाठी आलो नाहीत तर जनतेची सेवा करण्याकरता समाजकारण सोडून राजकारणात आलो अशा प्रकारचा विचार त्यांनी व्यक्त केला सेना सरकारला येथील शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे आहे म्हणून आपकी बार भाजप तडीपार अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी व्यासपीठावर संजय देशमुख, अंबादास दानवे ,किशोर तिवारी ,विश्वास नांदेकर, दुष्यंत चतुर्वेदी, संगीताताई पुरी, संतोष ढवळे यांनी सध्या सुरू असलेली यवतमाळ जिल्ह्यातील वास्तविकता सर्व समोर मांडताना बोलले की, गबरू आणि झिपरी खरंच हे पक्ष्याचे नाही झाले तर जनतेचे होणार का? असा प्रश्न करून वेळ आली ती धडा शिकविण्याची त्यावेळी आशावरी देशमुख ,उद्धव कदम यांची उपस्थिती होती सभेचे प्रास्ताविक संजय देशमुख यांनी केले यावेळी अंबादास दानवे यांनीही आपले विचार व्यक्त करून केंद्र सरकार व राज्य सरकारवर टीका केली.आजच्या सभेने सर्व सभेचे रेकॉर्ड मोडले जवळपास 20 हजार लोक खेड्यापाड्यातून जिल्ह्याबाहेरून सभेकरिता आले होते. नागपूर मार्गे कळम वरून राळेगाव येथे उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर वीर बापूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला हार घातला स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अड प्रफुल्ल मानकर माजी मंत्री वसंत पुरके यांनी उद्धव ठाकरे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला नंतर ते सभेत स्थळी पोहोचले त्या वेळी मंच्यावर जिल्यातील मान्यवर व राळेगाव येथील शिवसेना तालुका प्रमुख विनोद काकडे व शहर प्रमुख इम्रान पठाण उपस्थित होते…..