
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील उंदरी (धर्मापुर) गावामध्ये दि. १७/०६/२०२६ रोजी नागसेन पाणी वापर संस्था व गावातील शेतकऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण ज्ञानसाधना शिक्षण संस्था यवतमाळ व पाटबंधारे विभाग यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. पाणी वापर संस्था बळकट करणे, शेतकऱ्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करणे. बदलत्या परिस्तिथी नुसार पिक पद्धती मध्ये बदल घडवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानसाधना शिक्षण संस्थेच्या प्रशिक्षक भाग्यश्री पाटील यांनी पाणी वापर संस्थेची प्रस्तावना समोर मांडली त्यात पाणी वापर संस्थेचे महत्व , कार्य पद्धती तसेच लाभधारक सदस्यांना उद्भवणाऱ्या समस्या वर सखोल मार्गदर्शन केले पाणी वापर संस्था हि केवळ पाण्याचे नियोजन करणारी संस्था नसून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवणारी प्रभावी यंत्रणा असल्याचे सांगितले पाणी वापर संस्थाचे अध्यक्ष , सचिव व सदस्य यांची जबाबदारी काय असते संस्था गाव पातळीवर कशा प्रमाणे प्रभावीपणे काम करू शकते व शेतकऱ्यांच्या तक्रारी संबधित प्रकल्प अधिकाऱ्याकडे पाठवून त्याचे निराकरण कसे करता येते या विषयी त्यांनी सविस्तर सांगितले तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना , महिला बचत गटाच्या योजना , वृद्धासाठीच्या योजना, विद्यार्थ्यासाठीच्या योजना तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना या योजनाविषयी उपस्थितांना सविस्तर आशा प्रकारचे मार्गदर्शन प्रशिक्षक भाग्यश्री पाटील यांनी केले.
सह प्रशिक्षक प्रणय डोंगरे यांनी शेती व पिकाविषयी मार्गदर्शन केले त्यात त्यांनी पिक पद्धती मध्ये बदल करणे पारंपारिक कपाशी व तूर पिका ऐवजी हळद, मिरची, शेवगा लागवड, फळबाग लागवड, कमी पाण्याची पिके घेणे नगदी पिके कशी घ्यावी आदि पिकाचे लागवड ते काढणी पर्यंत चे पूर्ण मार्गदर्शन केले त्यानंतर त्याची साठवण व विक्री व्यवस्था तसेच प्रक्रिया उद्योग कशे गाव पातळीवर तयार करता येईल त्याचे पूर्ण ज्ञान शेतकऱ्यांना कसे प्राप्त होईल ह्याचे सविस्तर मार्गदर्शन सह प्रशिक्षक प्रणय डोंगरे यांनी केले आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ज्ञानसाधना शिक्षण संस्था यवतमाळ हि कटिबद्ध असल्याचे प्रशिक्षक भाग्यश्री पाटील यांनी उपस्थिताना आश्वस्त केले सदर चे प्रशिक्षण हे ज्ञानसाधना शिक्षण संस्था यवतमाळ चे सचिव मनीष भानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत प्रशिक्षणाला ज्ञानसाधना शिक्षण संस्था च्या प्रशिक्षक भाग्यश्री पाटील, , सह प्रशिक्षक प्रणय डोंगरे, नागसेन पाणी वापर संस्था चे अध्यक्ष राजूभाऊ खडसे, सचिव संजय तिवडे, संस्थाचे सदस्य, गावातील शेतकरी, महिला बचत गटाच्या सदस्य, व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशिक्षणाचे सूत्र संचालन नितेश तिवडे यांनी तर आभार प्रदर्शन सचिव संजय तिवडे यांनी केले
