२०२४ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक

वर्धा लोकसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढायचा कार्यकर्त्यांचा निर्धार

हिंगणघाट:- १२ जानेवारी २०२४
आगामी होणाऱ्या २०२४ च्या लोकसभा,विधानसभा नगरपरिषद,जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगणघाट विधानसभेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक-सचिव तथा माजी आमदार प्रा.राजु तिमांडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदादीकारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज्यात महाविकास आघाडी असून वर्धा लोकसभा राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या वाटेला जाण्याची दाट शक्यता आहे या संदर्भात मुंबई येथे रा. काँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच पक्षातील प्रमुख लोकांच्या उपस्थितीमध्ये तीन वेळा बैठक घेऊन आढावा घेण्यात आला त्यावेळी जिल्ह्यातील पक्षाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते व येणाऱ्या २०२४च्या वर्धा लोकसभेच्या महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पारड्यात पडल्यास माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांना उमेदवारी करण्याचा आग्रह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.
वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढायचा निर्धार करून पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी ताकदीनीशी कामाला सुरुवात केली. तसेच बैठकीत २०२४च्या सर्व निवडणुका,बूथ बांधणी, संघटनात्मक रचना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
ही निवडणूक शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची असून धोरण बदलण्यासाठी आपला हक्काचा प्रतिनिधी लोकसभेत जाणे गरजेचे आहे. शेतकरी,शेतमजूर, कामगार व सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या प्रश्नांवर लढताना आपल्या न्याय्य हक्कांसाठी आता निवडणूक लढवण्याची योग्य वेळ आली असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. सगळ्यांच्या साथीने ही लढाई जिंकू, असा विश्वास देखील याबैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
त्यावेळी समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिम्मत चतुर,इंटर सेक्रेटरी आफताब खान,शहराध्यक्ष विठ्ठल गुळगाणे, नरेंद्र थोरात,सौरभ तिमांडे,राजू गोल्हार,प्रकाश राऊत,राजू चंदनखेडे,अनिल भोंगाडे,बालाजी गहलोद, गुड्डू शर्मा,धनंजय बकाने,नाझीर अली, श्री.अवचट,राजू धनरेल, मुन्नाभाई,मोहन मुडे,संजय काळे, संतोष खाडे,राजेश भाईमारे, बाबा पांगुळ, गौरव तिमांडे,प्रतीक टोपलमोडे,भोला निखाडे, गणपत गाडेकर, विनोद झाडे,माणिक लांडगे, पप्पु मोहता,हरीश काळे,संजय चव्हाण,गोपाल पुरोहित,विजय तामगाडगे,विक्रांत भगत,पंकज वानखेडे, दिगंबर नवघरे, बंडू काटवले, दीपक माडे, किरीट शेजपाल, शेखर जाधव,आशिष मंडलवार,पंकज पाके,प्रवीण जनबंधू,जितेंद्र शेजपाल,योगेंद्र वाघमारे,जगदीश पिसे, नयन निखाडे,लीलाधर मडावी,अभिषेक ब्राह्मणे,पियुष जैस्वाल,रोहित अास्कर,रितू मोघे, हर्षल तपासे सूर्यकांत तिजारे,सुनील इंगोले, इनायत खान,पंकज पाके,शेरा भाई, विपिन थुल, प्रवीण काळे,चक्षुपाल शिंपी, नरेश पंमपंनवार,नितीन सुटे, विजय मून,संजय कावळे इत्यादी पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.