
राळेगांव ता 3 (तालुका प्रतिनिधी )
गुढीपाठवा व मराठी नववर्षाचे औचीत्य साधून झाडगांव येथील स्मशान भूमित भगवान शंकरांच्या मूतीची विधीवत मंत्रोच्चारात ग्रामस्थाच्या उपस्थीतीत प्रतिष्ठापणा करण्यात आली . झाडगांव येथील पोलीस पाटील प्रशांत वाणी यांनी आपल्या वडीलांच्या स्मृती प्रित्यर्थ सात फुटाची भव्य शंकरांची मूर्ती भेट दिली आहे . संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशाच्या व टाळ मूर्दूंगा च्या गजरात महीला पुरुष लहानाची मोठ्या प्रमाणात गर्दी होती . झाडगांव ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाल्या नंतर स्मशान भूमिचा कायापालट झाला आहे . ग्रामीण भागातील सरवी कृष्णापूर येथील मूर्तिकार प्रभाकर मसराम या ग्रामीण कलाकारांनी अत्यंत परीश्रमाने मूर्ती तयार केली आहे . स्मशान भूमित प्रशांत वाणी यांनी सहपत्नीक अभीषेक करून भगवान शंकराची प्रतिष्ठापना केली . स्मशान भूमित आयोजीत कार्यक्रमात मूर्तीकार प्रभाकर जगांजी मसराम यांचा आयोजन समिती ग्रामपंचायत च्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला माजी सभापती अशोक केवटे . यांनी त्यांचा सत्कार करण्यात आला . भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आला . संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन रुपेश रेंघे, सरपंच बाबाराव किनाके सर्वच ग्रापं सदस्य यांनी केले . झाडगांव ग्रामस्था चे मोलाचे सहकार्य लाभले हर हर महादेव च्या गर्जनेने कार्यक्रमाचा शेवट झाला रुपेश रेंघे यांनी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले .
