
सहसंपादक: रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सी. व्ही. रमण यांची जयंती साजरी करण्यात येऊन राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्त शाळेत विज्ञान प्रश्न मंजुषा, विज्ञान चर्चा सत्र यांचे आयोजन करण्यात आले.. विज्ञान दिनाच्या निमित्त शाळेतील विज्ञान विषय शिक्षक निलेश गोरे, सचिन दहिकर यांनी विद्यार्थ्यांना सी. व्ही. रमण यांच्या जीवन चरित्र बद्दल माहिती दिली. शाळेतील या राष्ट्रीय विज्ञान उत्सवा करिता शाळेतील सर्व विज्ञान विषय शिक्षकांनी सहकार्य केले. शाळेतील या विज्ञान दिना निमित्त शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते……
