
निवडणूक आयोगाने तारखेत बदल करावा -संयुक्त रिपब्लिकन आघाडी
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ला दुपारी ३.३० वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र व झारखंड या राज्यांच्या निवडणुकीचा वेळापत्रक जाहीर केला. त्यात महाराष्ट्राची निवडणूक एकाच टप्प्यामध्ये 20 नोव्हेंबरला होणार आहे व 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे
23 नोव्हेंबर 1994 ला 114 गोवारी शहीद झाले .आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार असेल तर 114 गोवारीना मानवंदना देण्याऐवजी आपण त्या दिवशी फटाके फोडून मिरवणुकीचा उत्सव साजरा करणे ही योग्य नाही? कारण 23 नोव्हेंबरला 114 गोवारी आपल्या आरक्षणाच्या हक्कासाठी शहीद झाले. आपण त्यांना त्या दिवशी मानवंदना दिली पाहिजे .महायुती जर विजय झाली तर त्यांच्या पक्षातर्फे फटाके फुटतील व महाविकास आघाडी विजय झाली तर त्यांच्यातर्फे राज्यांमध्ये फटाके फुटतील व दिवाळी साजरी होणार आहे .
परंतु 23 नोव्हेंबर 1994 ला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान गोवारी समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून कास्ट सर्टिफिकेट व कास्ट व्हॅलिडीटी देण्यात यावी या मागणी करता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भव्य मोर्चा काढला होता. त्या मोर्चादरम्यान चेंगराचेंगरीत 114 गोवारी शहीद झाले आणि 500 नागरिक जखमी झाले. नागपूर पोलीस लाठी चार्ज च्या माध्यमातून गोवारी समाजाच्या मोर्चा कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच माध्यमातून चेंगराचेंगरीत 114 गोवारी शहीद झाले.त्या दिवशी निवडणूक आयोग विजय उत्सव साजरा करणार आहे का? आणि फटाके फोडणार आहेत का !याचा विचार करावा .
करिता संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ प्रदेश जिल्हा भंडारा तर्फे निवडणूक आयोगास अशी विनंती करण्यात येत आहे की, 23 नोव्हेंबर 2024 ला जाहीर होणारा निवडणुकीचा निकाल 22 नोव्हेंबर 2024 किंवा 24 नोव्हेंबर 2024 जाहीर करावा अशी मागणी निवडणूक आयोगाला संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ प्रदेश तर्फे
विदर्भ संयोजक चंद्रशेखर टेंभुर्णे ,रोशनभाऊ जांभुळकर , साहित्यिक अमृत बनसोड , अमृत गजभिये नागपूर, आसित बागडे ,डॉ सुरेश खोब्रागडे, विजय भोवते ,राजेश मडामे,दिलीप वानखेडे, ग्यानचंद ताराचंद जांभूळकर, रमेश जांगडे, शिवदास गजभिये, पत्रकार संजीव भांबोरे यांनी एका पत्रकाद्वारे केलेली आहे.
