
बालउपक्रमा अंतर्गत जि.प शाळा, परमडोह येथिल विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद,यवतमाळ येथील मुख्यकार्यकारी अधिकारी साहेबांसह जिल्हा परिषद मधिल वेगवेगळ्या विभागातील विभागप्रमुखांची मुलाखत घेऊन जिल्हा परिषदचा कारभार कसा चालतो हे जाणून घेतले. जि प सभागृहात विद्यार्थ्यांना उबुंटू हा चित्रपट दाखवून त्यावर मा. गाढवे मॅडम विस्तार अधिकारी शिक्षण यांनी वेगवेगळी प्रश्न विचारून संवाद साधला. वित्त विभागात मा.ज्योती भोंडे मॅडम मुख्यलेखा अधिकारी यांनी विविध आर्थिक योजनाची माहिती दिली. पाणीपुरवठा विभागातील मा. प्रदीप कोल्हे साहेब मुख्य अभियंता यांनी विविध सिंचन व पाणीपुरवठा योजनांची माहिती दिली.शिक्षण विभागातील मा.प्रमोद सूर्यवंशी साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी जिल्हा परिषद शाळा व शिक्षण यावर मार्गदर्शन केले तसेच विभागातील विविध टेबल वरील कर्मचाऱ्यांचे कार्य प्रत्येक टेबल जवळ नेऊन सांगण्यात आले. झेप संवाद चे शेवटचे परव मुख्यकार्यकारी अधिकारी साहेबांच्या कार्यालयात साहेबांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सुमारे दिड तास साहेबांच्या वैयक्तिक आयुष्यापासून प्रशासकीय कार्यातील अडचणी पर्यंत अनेक प्रश्न विचारून मुलाखत घेऊन शाबासकी मिळविली… विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बघून साहेबांचे शब्द – “माझ्या आयुष्यातील UPSC परीक्षेतील मुलाखत नंतर ची सर्वात कठीण मुलाखत आज मी दिली. असाच आत्मविश्वास पुढेही ठेवा.”. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनविलेली भेटकार्ड व पुष्पगुच्छ देऊन सर्व अधिकारी मोहद्यांचे आभार मानले.
