खैरी जिल्हा परिषद शाळेत गुणवंत विद्यार्थिनीचे हस्ते झेंडावंदन: शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचा स्तुत्य उपक्रम

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मध्ये स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळेतील माजी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी कु. तेजस्विनी मारुती वाकडे हीचे हस्ते झेंडावंदन करून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे व शाळा व्यवस्थापन समितीने एक स्तुत्य उपक्रम राबविला.
यापूर्वी जिल्हा परिषद शाळा मध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे हस्ते ध्वजारोहण व्हायचे परंतु यावेळी खैरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे यांनी यापुढे जिल्हा परिषद शाळेमधून शिकून गेलेला व दहावी व बारावीत चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांचे हस्ते ध्वजारोहण करायचे असा ठराव घेतला. त्यानुसार यावर्षीच्या 15 ऑगस्ट झेंडावंदन जिल्हा परिषद शाळेची माजी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी कुमारी तेजस्विनी मारुती वाकडे हिच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनीच्या हस्ते झेंडावंदन झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. झेंडावंदनानंतर प्रभात फेरी निघून नंतर शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यात आली. यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख सुरेश कुंभलकर तसेच शाळेचे समस्त शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे, उपाध्यक्ष ज्योती जगदरे, सदस्य सविता सवाई, वैशाली दोडके, गीता निंबुळकर, विठ्ठल आसुटकर, विनोद हेपट, प्रमोद डफरे तसेच ग्रा .प. उपसरपंच श्रीकांत राऊत, सदस्य रवींद्र नीवल, उमेश भारशंकर , रमाताई वनकर हे उपस्थित होते.
. खैरी जिल्हा परिषद शाळा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखडे व शाळा व्यवस्थापन समितीने घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांचे खैरी व परिसरात कौतुक होत आहे. त्यांनी हा राबविलेला उपक्रम खूपच स्तुत्य आहे असे खैरी व परिसरातील नागरिकांच्या तोंडून ऐकावयास मिळत असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

:

गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंडावंदनाचा ठराव घेण्यामागचे उद्दिष्ट असे होते की आपल्या जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन गेलेल्या व दहावी बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते जर आपण 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण जर केले तर सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळेल व ते सुद्धा पुढे आपल्या हस्ते ध्वजारोहण व्हावे या या दृष्टिकोनातून चांगला अभ्यास करून दहावी बारावी चांगल्या गुणवत्तेने पास होण्याचा प्रयत्न करेल म्हणून यापुढील ध्वजारोहण हे जिल्हा परिषद शाळेतील शिकून गेलेल्या व दहावी बारावी चांगल्या गुणवत्तेने पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करायचे ठरविले असे खैरी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे यांनी सांगितले.