
सहसंपादक : रामभाऊ भोयर
बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती संपूर्ण देशात 15 फेब्रुवारीला 287 वी जयंती मोठ्या उत्साहात बंजारा बांधव साजरी करत असतांनाच शासनस्तरावर या जयंतीला विशेष महत्त्व प्राप्त झाल्यामुळे मागील काही वर्षांपासून शासनाने संत सेवालाल महाराज जयंती शासनस्तरावर साजरी करण्यात यावी असे परिपत्रक काढले असल्याने या जयंतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून बऱ्याच ठिकाणी ही जयंती साजरी करण्यात येत असतांनाच अनेक शाळांमध्ये, कार्यालयामध्ये जयंती साजरी होत नसल्याचे स्पष्ट दिसत असून अनेक ठिकाणी अनेक शाळांमध्ये, कार्यालयात संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची प्रतिमा दिसून येत नाही. जर काही कार्यालयात , शाळांमध्ये फोटोच नाही तर जयंती साजरी होत असेल हे कशावरून समजायचे.तरी या जयंतीला शासनस्तरावर साजरी करण्याची मान्यता दिली असल्याने संबंधित विभागाने त्या विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांनी संत सेवालाल महाराज यांची प्रतिमा नियमित लावून जयंती साजरी करण्याकडे विशेष लक्ष द्यावे.या बाबत आपण यवतमाळ जिल्हा पालकमंत्री नामदार संजयभाऊ राठोड यांना निवेदन देऊन या जयंती बाबत गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य बंजारा कर्मचारी संघटनेचे राळेगाव तालुका अध्यक्ष , खरेदी विक्री संघाचे संचालक तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावणसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
