अशोक उमरतकर यांना महात्मा ज्योतीबा फुले समाजगौरव पुरस्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

कळंब तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. अशोक मोतीराम उमरतकर कळंब यांना “मदत ” सामाजिक संस्था नागपूर द्वारे आयोजीत २१ वे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन पुरस्कार सोहळा गुरुदेव सेवाश्रम नागपूर येथे महात्मा ज्योतीबा फुले समाज गौरव पुरस्कार, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, बुके, संविधान पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा आमदार मा. श्री. नाना पटोले, राधीकाबाई पांडव, ट्रस्ट संचालक मा.श्री. गिरीश पांडव, आमदार मा.श्री. अभिजीत वंजारी, अनिन नगरारे सरचिटणीस कॉग्रेस कमेटी, संजय कडोळे अध्यक्ष विदर्भ लोककलावंत संघटना, दिनेश वाघमारे संस्थापक/सचिव मदत सामाजिक संस्था, नरेंद्र खडसे कार्यकारी अध्यक्ष, सुनील जिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

अशोक उमरतकर सामाजिक कार्यकर्ते असुन विविध संस्थांचे पदाधिकारी आहेत त्यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.