
स्पेक्ट्रम काॅट फायबर BCI यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रा.प.पिंपळखुटी यांच्या पुढाकाराने स्मशानभूमीत 150 वॄक्ष लागवड करण्यात आली आहे स्पेक्ट्रम काॅट फायबर या कंपनीचे एकूण 7 घटकांपैकी महत्वाचा घटक म्हणजे जैवविविधता या निसर्गातील प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून असते वॄक्ष लागवड व संगोपन खुप महत्वाचे आहे त्या अनुषंगाने वॄक्ष लागवड मोठ्या उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा श्री प्रशांतभाऊ तायडे (माजी सभापती ) ,श्री संरक्षित गावंडे (उपसरपंच ),श्री सुधाकर हिवरकार (ग्राम सेवक ) तसेच स्पेक्ट्रम काॅट फायबर चे श्री लक्ष्मण येडस्कार क्षेत्र अधिकारी व लिड क्षेत्र अधिकारी श्री हितेश भोयर, तसेच गावातील वॄक्ष प्रेमी श्री सुनील आष्टकार ( गुरु देव सेवा मंडळ) श्री कैलाश मेसरे ( तंटामुक्त अध्यक्ष ) श्री आवडू पाल, श्री वाल्मिक एकोणकर, श्री किशोर गावंडे, महेश अंबाधरे , श्री खुशाल कोवे, प्रकाश शेंडे , सुमेध कांबळे आदी उपस्थित होते.
