उमरखेड येथील तहसील प्रांगणामध्ये वन विभागाच्या विरोधात आमरण उपोषण
उपोषणाचा दुसरा दिवस


उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड

आज दिनांक 5/7/ 2023 पासून उमरखेड येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात एकूण 6 प्रकरण घेऊन वन विभागाच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे राष्ट्रीय संपत्तीची विलेवाट वनसंरक्षन कर्त्यांनी लावली डॉक्टर आंबेजोगाईकर अग्निबाण लाईव्ह न्युज चैनल उमरखेड व विजय कदम (लोकहित लाईव्ह न्युज चैनल उमरखेड) विश्वास काळे यांच्या नेतृत्वात राजेश एन खंदारे उपोषण करीत आहेत सय्यद खाज्या यांचा या उपोषणास जाहीर पाठिंबा आहे
प्रमुख मागण्या खालील प्रमाणे
1) खंड नंबर1 शेत सर्वे नंबर 5 /1 अ मधील अवैधरित्या तोडलेल्या नाल्यावरील सागवान वृक्षाची तक्रार देऊन सुद्धा चौकशी न करता डमी तक्रार कर्ता मार्फत प्रकरण दाबल्याबाबत चौकशीसाठी,
2) अतुल निल पवार यांच्या आरा मशीन मधील घरामध्ये सापडलेल्या सागवानीची चौकशी का दाबली?
3) बिटरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या शेतातील 20 एकर
विनापरवानगी तोडलेल्या सागवान वृक्षांची चौकशी करणे.
4) गुलाब दूधवाला सुकळी जहागीर येथील कपाडी हनुमान मंदिराजवळील अवैधरीत्या तोडलेल्या मोहाच्या आड जात व सागवान वृक्ष तोडून नवाटी निर्माण केल्या बाबत चौकशीसाठी
5) बावीस पाच 2023 रोजी कार्यालयीन वेळेत वनपरिक्षेत्र अधिकारी पांडे कुटुंबासह विडूळ येथे लग्नाला गेले होते त्याबद्दल दिलेला खुलासा अमान्य असल्याबाबत चौकशीसाठी,
6) वरील सर्व प्रकरण दाबण्यामध्ये उपविभागीय वन अधिकारी करे साहेब, वनपरिक्षेत्र पांडे साहेब, वनपाल हक साहेब डमी तक्रार कर्त्याची चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत आंदोलन सुरू आहे.