
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड,
मो.7875525877
मौजा कुरळी ता.उमरखेड जि.यवतमाळ येथील जि.प.सिचंन विभागांतर्गत असलेला पाझर तलाव काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे फुटल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा शासकीय मोबदला किंवा मदत मिळाली नाही त्या अनुषंगाने ते आजपासून तहसिल कार्यालय परिसरात आमरण उपोषणाला बसले आहेत त्या प्रसंगी आज भाविक भाऊ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनुपभाऊ शेखावत जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भाऊ राठोड यांनी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गोरगरिबांच्या सेवेसाठी मदतीसाठी आज हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेड भाविक भाऊ भगत यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे.
यादवराव नप्ते काका यांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेड त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
