राजू ढोबळे यांचे शहरवासीयांनी आयोजित केला अभिनंदन सोहळा

ढाणकी प्रतिनिधी::
प्रवीण जोशी
ढाणकी येथील टेंभेश्वर नगर ( झोपडपट्टीत) येथे राहणारा राजू ढोबळे यांच्या बालपासूनच देश सेवा,समाजसेवा,व मातृभूमीसाठी जगायचे असा मनी ध्यास होता.परंतु घरची परिस्थिती बेताची आई वडीलानी रोजमजुरी करत राजुचे शिक्षण पूर्ण केले.यातच त्याला भरती साठी पैसा लागत असे यावरुन राजुला आई वडील व कुटुंबातील सर्व जन राजू ने कुठेतरी सरकारी नौकरी मिळावी व त्याचे जीवन आपल्या सारखे खडतर न जगता आनंददायी जीवन जगावे असे स्वप्न जणू उराशी बाळगून होते.राजुच्या शिक्षणासाठी पैसा लागत असल्यामुळे राजुला आई वडिलांचे व कुटुंबाचे खडतर प्रवास पहावा वाटत नसे.त्यामुळे राजुने आई-वडिलांसोबतच स्वतः रोज मजुरी करू लागला. जागा निघतील तिथे अर्जभरून भरतीला जाऊ लागला. जे देश सेवेसाठी काम करतात अर्थात निवृत्त सैनिकांचे मार्गदर्शन घेऊ लागला.त्याला तसे पुरेपूर मार्गदर्शन सुद्धा लाभले. बऱ्याच वेळेस भरती मध्ये अपयश सुद्धा प्राप्त झाले . परंतु खचून न जाता नव्या उत्साहाने व जोमाने जिद्द व चिकाटीच्या भरोशावर अखेर राजूला यश प्राप्त झाले. अखेर राजू ढोबळे यांची आसाम रायफल इथे सैनिक या पदावर नियुक्ती झाली. म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्याप्रमाणे राजू न खचता परिस्थितीवर मात करून अखेर यश त्याचा पदरी पडले.त्यामुळे राजुच्या आई वडिल व कुटुंबीयांचे डोळे आनंदाश्रुनी पानावले. त्यातच राजुचे इष्टमित्र ,शेजारी यांना पण खूप आनंद झाला. त्यांनी सुद्धा राजूचे अभिनंदन केले . ही बाब काही पत्रकार यांना समजली व बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष ठाणेदार सुजाता बनसोड यांना कळाली . त्यांनी व त्यांच्या चमूने सुद्धा स्वतः राजूच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांनी त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगताना त्यांचा सुद्धा कंठ दाटून आला. त्यांनी राजुला शुभेच्छा देऊन एवढ्यावर न थांबता आणखी अभ्यास करून याहीपेक्षा मोठ्या पदावर नियुक्ती व्हावी असे संबोधित केले.
