
वरोरा गणेश भक्त दर्शन घेत होते. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सभामंडपात आपल्या कार्यात्मघ्न असताना
गणेश मंडळाच्या सभा मंडपा समोर असलेली
दानपेटी वरदळीमध्येच चोरट्याने पळविली. सभा मंडपातील सीसीटीव्ही फुटेजवरून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी चोरट्यास अवघ्या काही वेळेत पकडून वरोरा पोलिसांच्या ताब्यात दिले.
वरोरा शहरातील महात्मा गांधी चौकात मागील कित्येक वर्षापासून कल्पतरू गणेश मंडळाच्या वतीने गणेश मूर्तीची स्थापना करून दरवर्षी अनेक आकर्षक सजावट असलेले देखावे. या मंडळातर्फे केले जाते. आकर्षक देखावे बघण्याकरिता भाविक मोठ्या प्रमाणात कल्पतरू गणेश मंडळाजवळ गर्दी करून दर्शन घेत असतात भाविकांना दान देणे सुकर व्हावे.
याकरिता सभा मंडपाबाहेर दानपेटी ठेवली जाते. १२ सप्टेंबरच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास दानपेटी दिसून आली नाही. त्यामुळे कल्पतरू गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सभा मंडपातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली व शहरात चोरट्याबाबत शोध मोहीम राबवणे सुरू करत वरोरा पोलिसांना माहिती दिली कल्पतरू गणेश मंडळाच्या पदाधिकारी व वरोरा शहरातील नागरिकांनी चोरट्यास पकडले व वरोरा पोलिसांच्या ताब्यात दिले. दानपेटीतील अंदाजे दहा हजार रुपये चोरी केल्याची तक्रार कल्पतरू गणेश मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेश महाजन व शशिकांत चौधरी यांनी वरोरा पोलिसात दिली. कल्पतरू गणेश मंडळाने सभामंडप व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने तो चोटा जेरबंद झाल्याचे मानले जात आहे.
याप्रकरणी प्रशांत रामदास वाकुलकर वय ३० राहणार खांबाळा याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून वरोरा पोलिसांनी अटक केली आहे.
