पावसाळी तालुक्याची विजयाची परंपरा झाडगावने कायम ठेवली, मुलींचा कबड्डी संघ ठरला तालुका विजेता

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शासनाकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण विभागाकडून दरवर्षी पावसाळ्यात मुला मुलींच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. तशाच प्रकारे यावर्षी सुध्दा मुला मुलींच्या तालुका कबड्डी स्पर्धा वडकी येथील सैनिक पब्लिक स्कूल येथे 28/8/2024 ते 29/8/2024 पर्यंत आयोजित करण्यात आल्या होत्या.त्यामध्ये झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खेळाडूंनी आपला खेळ दाखवून इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय राळेगावच्या विद्यार्थीनी खेळाडूचा फार मोठ्या फरकाने दारूण पराभव करून आपलं तालुका विजेते पद पटकावून विद्यालयाचं नावलौकिक केले. या विजयामुळे दरवर्षी प्रमाणे झाडगावचे विद्यालय विजयाकडे वाटचाल करीत असल्याने परत हे विद्यालय चर्चेत आले असून या विजयी खेळाडूंमध्ये आपला खेळ दाखविणाऱ्या प्रिया संगेवार, वेदिका निमट, समिक्षा ठाकरे,अणू नेहारे,कशिश सलाम,वंशिका नाकाडे,कृतिका खडसे, अंकिता करलुके, दिक्षा चव्हाण,वर्षा तराडे, समिक्षा सलाम, रुपाली गेडाम यांनी खेळ दाखवून प्रेक्षकांना मोहित केले तर वेदिका किरण निमट ही अंतिम सामन्यात विजयाच्या सामन्यात संघाची हिरो ठरली.या विजयी खेळाडूंना महिला कबड्डी कोच सौ.वंदना वाढोणकर व दुसरे कोच तथा शारीरिक शिक्षक मोहन बोरकर सरांचे मार्गदर्शन लाभले.या विजयी संघाचे विजय संपादन करून शालेय परिसरात आगमन होताच शाळेचे अध्यक्ष दिलीप कोल्हे यांनी खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन व सन्मानचिन्ह देऊन कौतुक केले त्यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापका सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या नंतर जिल्हा स्तरावर होणाऱ्या खेळाचा सराव करतांना प्रचंड मेहनत घेणार असल्याचे कोच मोहन बोरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.