.

सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्थानिक धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा संलग्नित आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथे स्व. श्री. लक्ष्मीनारायण अग्रवाल यांच्या जन्मदिन/कृतार्थता दिन निमित्ताने विविध स्पर्धा प्रदर्शनीचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने भव्य स्वरूपात करण्यात येणार आहे.दिनांक 7 जानेवारी ला होणाऱ्या उदघाटन सोहळ्यास धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल, उपाध्यक्ष एड. रमेशचंद्र चांडक, सचिव आशिष कुमार राठी, सहसचिव डॉ. असितकुमार पसारी, तसेच महाविद्यालय समिती अध्यक्ष प्रदीप कुमार लुनावत व प्राचार्य डॉ. एस. एन. बायस्कर यांचे सह संस्थेच्या सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पुष्परंग प्रदर्शन
धामणगाव नगरीत प्रथमच भव्य स्वरूपात विविध प्रकारच्या फुलांच्या रोपांच्या प्रदर्शनी आयोजन व त्या सोबतच विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे दिनांक 7 जानेवारी ते 09 जानेवारी 2026 सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत ही प्रदर्शनी धामणगाव मधिल सर्व वृक्षप्रेमी नागरिकांसाठी खुली राहणार आहे.
जिज्ञासा विज्ञान प्रदर्शन
विज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती आणि त्यांच्या मध्ये असणाऱ्या वैज्ञानिक चिकित्सा पद्धतीला चालना देण्याकरता व धामणगाव सारख्या गावातून भविष्यात चांगले वैज्ञानिक तयार व्हावे या उदात्त हेतूने जिज्ञासा विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन गट क्रमांक एक आठवी ते दहावी गट क्रमांक दोन पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन गटात केले आहे. दिनांक 8 जानेवारी 2026 ला या जिज्ञासा विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या द्वारे संपन्न होणार आहे.
ज्ञानरंग ग्रंथ प्रदर्शनी
आदर्श महाविद्यालयाच्या परिसरामध्ये प्रथमच ज्ञानरंग ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार असून महाविद्यालयातील ग्रंथालयात असणारे विविध विषयांची पुस्तकं विविध पद्धतींची पुस्तके वाचन प्रेमींसाठी खुले करण्यात येणार असून या ग्रंथ प्रदर्शनी मध्ये विदर्भातील नामवंत बुक स्टॉल्स सुद्धा आपले पुस्तकांची विक्री खरेदी करण्याकरिता उपलब्ध असणार आहेत.
कलारंग
विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना भाव मिळावा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये विकास घडवून यावा या उदात्त हेतूने कलारंग या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात येणार असून यामध्ये वक्तृत्व स्पर्धा पोस्टर मेकिंग स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.स्व. श्री. लक्ष्मीनारायण ची अग्रवाल यांच्या जन्मदिन/ कृतार्थता दिन निमित्ताने प्रथमच भव्य स्वरूपात स्पर्धांचे व प्रदर्शनीचे आयोजन आदर्श महाविद्यालयाने केलेले असून या प्रदर्शनीची जय्यत तयारी महाविद्यालय परिसरात सुरू आहे या सर्व प्रदर्शनीमध्ये स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सहभाग घ्यावा व धामणगाव परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनींना पाहण्याकरिता यावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन.बायस्कर यांनी केले आहे. उपरोक्त प्रदर्शनी स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.
