
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भगवान पंढरीष परमात्मा व आई श्री संत सती सोनामाता यांच्या असीम अप्पा आशीर्वादाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र डोमाघाट येथे महान तपस्वी अवलिया संत श्री सती सोनामाता यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच श्री संत सोना माता पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र डोमा घाट येते दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ ते १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या अखंड हरिनाम सप्ताहाला श्री संत ऋषी महाराज संस्थान श्री क्षेत्र ऋषी गड महालब्ध तालुका सोयगाव हे लाभले असून आज सकाळी ८:०० वाजता श्री संत सोनामाता यांची डोमाघाट येथून पालखी सोहळा व भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे त्यानंतर दुपारी ११:०० ते १:०० ह भ प संदीप महाराज सांगळे यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर दुपारी १ :०० ते २:०० सत्कार सोहळा व दहीहंडी त्यानंतर दुपारी २ :०० वाजता पासून महाप्रसादाला सुरुवात होईल तरी या पुण्यतिथी उत्सव सोहळ्याला व महाप्रसादाला सर्वत्र भाविक भक्तांनी तन-मन-धनाने व श्रमाने कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अवलिया सती सोनामाता देवस्थान येवती (डोमाघाट ) व विश्वस्त समस्त येवती ग्रामवासी भाविक मंडळींनी केली आहे.
