
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सराटी लोणी रस्त्याची वाट लागली असून तीन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे रोडचे सराटी गावापासून लोणी रोडपर्यंत अर्धा किलोमीटर तसेच सराटी गावापासून मोहदा रोडकडे अर्धा किलोमीटर डांबरीकरण करण्यात आले नाही त्यामुळे लोणी ते मोहदा यामधील मधला एक किलोमीटर रस्ता एवढा खराब झाला असून अक्षरशः रस्त्याची चाळणी झाली आहे त्यामुळे त्या रोडनी चालणाऱ्या दोन चाकी,तीन चाकी, चार चाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन चालावं लागतं असून या कामाकडे संबंधित विभागाने स्पेशल दुर्लक्ष केले असल्याने त्या रस्त्यावर काम केले असं दाखवून त्याचे बिल काढून रफादफा केले असल्याची शंका त्या परिसरातील नागरिकांना यायला लागली आहे.या बाबतीत मागील काही दिवसांपूर्वी शासनाच्या निदर्शनास आणून द्यायला गावातील काही लोकांनी वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध करून शासनाच्या अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला परंतु सबका साथ सबका विकास करणाऱ्या शासनकर्त्याच्या निगराणीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्याचा फारसा परिणाम झाला नसून या अशा दुर्लक्षित धोरणामुळे संबंधित रोडचे काम करणारे आणि शासनकर्त्याची मिलीभगत तर नाही अशी चर्चा सुरू झाली असून जनतेला विकासाची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी वृत्तपत्रातील बातम्या वगैरे वाचत नसतील का असा प्रश्न उपस्थित होत असून या एक किलोमीटर रस्ता पूर्ण करून न दिल्यास पुनश्च एकदा निवेदन सादर करून आमरण उपोषण करणार असल्याचे सराटी गावचे सरपंच संतोष आत्राम उपसरपंच आकाश पवार गावातील प्रतिष्ठित अनिल ठाकरे, संतोष तोंदवाल , विष्णू गजबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
