
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पी एम श्री उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उत्तम पवार सर दिनांक 30/7/2026 सेवेतून निवृत्त झाले.उत्तम पवार सर हे कळंब तालुक्यातील पिंपळशेंडा या गावाचे रहिवासी असून त्यांनी २६ जुलै १९९१ रोजी घाटंजी तालुक्यातील शिवणी या गावात रूजू झाल्यानंतर अनेक वर्षे नोकरी करून कळंब तालुक्यातील पिंपळशेंडा,अतंरगाव असा प्रवास करत करत राळेगाव तालुक्यातील आष्टा या गावात रूजू झाले तेथे सेवा सुरू असताना आणि नोकरी दोन वर्षे असतांनाच पी.एम.श्री.उच्च प्राथमिक शाळा वरूड जहांगीर येथील मुख्याध्यापक पदाची सूत्रे स्वीकारली.वरूड येथील शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असताना शाळेत अनेक उपक्रम राबविले. शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले.शाळेचे विद्यार्थी नियमित कसे शाळेत येतील याकडे विशेष लक्ष दिले.शाळेच्या कालावधीत आपल्या खाजगी जीवनात विशेष लक्ष न देता विद्यार्थी कसे घडतील याकडे लक्ष दिले. पवार सरांनी गावातील पालकांशी संवाद साधत सर्वांना आपलेसे केले होते. अशा या मुख्याध्यापक उत्तम पवार सरांची दोन वर्षांची कारकीर्द कधी पूर्ण झाली हे लक्षातच आले नाही आणि एक सेवाभावी, सुस्वभावी मितभाषी आणि शिस्तीचे धडे देणारे मुख्याध्यापक उत्तम पवार सर 30/7/2026 रोजी सेवेतून निवृत्त झाले.त्यानिमित्त दिनांक 30/7/2026 मंगळवारला त्यांचा भेटवस्तू, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.त्यावेळी कार्यक्रमाला राळेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने , निलेश दाभाडे यांच्या सह गावातील सरपंच प्रियंका पेंदोर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयश्री कडू, पोलिस पाटील नरेंद्र चव्हाण, जयसिंग पवार, मधूकर आडे आशा वर्कर निर्मला वासरिकर तलाठी चांदेकर मॅडम, योगेश राऊत, मनोहर कडू, संदीप जाधव शाळेतील शिक्षक प्रभारी मुख्याध्यापक सुजित येंडे, जेष्ठ शिक्षक भागवत चौधरी सर,कुणाल भगत सर, मृणालिनी महाजन मॅडम, कल्पना लाभे मॅडम यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
