
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा समाजाला दिशा देणारे महामानव स्व. वसंतरावजी नाईक यांची जयंती महाराष्ट्र बंजारा कर्मचारी संघटनेच्या वतीने राळेगाव येथे साजरी करण्यात आली.त्यावेळी बंजारा कर्मचारी संघटनेचे राळेगाव तालुका अध्यक्ष श्रावणसिंग वडते सर यांनी प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात केले सोबतच उपस्थित सर्व बंजारा बंधू भगिनींनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेतले.त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी ताराचंद पवार सर यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.सोबतच रमेश चव्हाण सरांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष श्रावणसिंग वडते सर व इतर पदाधिकारी रमेश चव्हाण सर, शिवाजी जाधव सर, ताराचंद पवार सर, काॅन्स्टेबल निलेश चव्हाण, काॅन्स्टेबल रूपेश जाधव, काॅन्स्टेबल शितल जाधव, काॅन्स्टेबल अविनाश चव्हाण, निखिल आडे सर, सौ गिता वडते दिव्या वडते/राठोड, वैशाली ताराचंद पवार, सर्वेशकुमार राठोड राळेगावकर यांच्या सह अनेक समाज बंधू भगिनी उपस्थित होते.
