
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
शाळेच्या पहिल्या दिवशी जि प शाळा मजरा येथे शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्व तयारी मेळावा सर्व शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या सहकार्याने घेण्यात आला.
सर्वप्रथम शाळेची सुंदर अशी सजावट गावातील युवकांनी केली तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर अशी रांगोळी रेखाटली .इयत्ता पहिली मध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले ,सर्व नवीन विद्यार्थ्यांचे पाऊल खुणा कागदावर उमटवून त्यांच्या पालकांना सोपविण्यात आल्या. तसेच त्यांना अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीत बसवून गावातून फेरी मारण्यात आली.
या फेरीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य विद्यार्थ्यांचे पालक व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. प्रभात फेरीनंतर सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले.
त्यानंतर इयत्ता पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांचा शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन घेण्यात आला. त्यासाठी विद्यार्थी व त्यांचे पालक आवर्जून उपस्थित होते .शाळा पूर्वतयारी मेळाव्याच्या स्टॉलचे संपूर्ण नियोजन गावातील महिला बचत गटांनी केले .शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना मसालेभात व मोतीचूर लाडू देण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अतिशय आनंदमय झाली त्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती , शाळेतील स्वयंपाकी व मदतनीस अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर तथा समस्त गावकऱ्यांनी हातभार लावला. शाळा व बैलगाडीच्या सजावटीसाठी हनुमान टेकाम , अनिल जुनघरे व हार्दिक जुनघरे यांनी विशेष सहकार्य केले .
ग्रामपंचायत सदस्य सौ. निमाताई जुनघरे यांच्या बैलगाडीमुळे कार्यक्रमाची शान वाढली.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेतील सहाय्यक शिक्षिका शितल येलेकर मॅडम यांनी केले ,तर कार्यक्रमाचे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापिका वर्षा लोणारे यांनी केले.
