
आंदोलनास विविध संघटनेचा पाठिंबा
सहसंपादक : रामभाऊ भोयर
२८ ऑगस्ट पासून बेरोजगार आदिवासी युवकांनी जिल्हा परिषद यवतमाळ च्या समोर बेमुदत साखळी उपोषण पेसा नोकर भरती शासनाने तात्काळ करावी यासाठी सुरू केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास व चुकीचा अर्थ काढून राज्य शासनाने अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींची नोकर भरती प्रक्रिया थांबवली आहे. तसेच आदिवासींचे १२,५०० पद भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली नाही , त्यामुळे राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये आदिवासी उमेदवारांवर अन्याय झालेला आहे, तरी भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनस्त राहून आदिवासी उमेदवारांची तात्काळ पेसा नोकर भरती , व १२५०० पद भरती घेण्यात यावी असे डॉ. अरविंद कुळमेथे यांनी मटले व असे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना देण्यात आले आहे.
हे आंदोलन २८ ऑगस्ट पासून सुरू असून या आंदोलनास विविध संघटनेचा पाठिंबा मिळत आहे. याआधी नाशिक येथे मोठ्या संख्येने पेसा नोकर भरती करण्यात यावी यासाठी हे बेमुद्दत उपोषण सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये व तालुक्यांमध्ये हे आंदोलन करण्याचे आदिवासी युवकांनी ठरवलेला आहे, शासनाने तात्काळ या मागण्या पूर्ण न केल्यास उग्र पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस बिरसा ब्रिगेड चे महा प्रदेशचे अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे, प्रा. वसंत कनाके, सुरज मरस्कोल्हे, संभाजी ब्रिगेडचे सुरज खोब्रागडे, बिरसा ब्रिगेडचे अल्केश कनाके, अर्णव मडावी, उलगुलान संघटनेचे राजू चांदेकर, बहुजन चळवळीचे प्रमोद कांबळे, अशोक काळमोरे ,आंदोलन करते नयन पेंदोर, रोहित मरस्कोल्हे, आकाश मेश्राम, वैभव कुळमेथे, दिगांबर कोडापे ,शुभम गेडाम, शंकर मेश्राम, कपिल कुमरे ,रोशन मंगाम, सुनील सिडाम, सूर्यकांत पेंदोर,प्रफुल पुरके, प्रशांत चिकराम, रोशन चांदेकर, अनिल आत्राम, अविनाश टेकाम, एड.आकाश टेकाम, वामन आत्राम, मनोज मेश्राम, गौरव गेडाम, प्रशांत पेंदोर, मंगेश सिडाम, अनिल करके,आशुतोष कुळसंगे, कल्याणी चांदेकर, सोनाली सोयाम, प्रांजली आत्राम बिरसा क्रांती दलचे जीवन कोवे , शरद चांदेकर, संजय मडावी, कैलास बोके ,नागोराव गेडाम,राजू मडावी,शुभम चांदेकर,विनोद उईकें, किरण नैताम ,तुकाराम जुमणाके,नारायण पेंदोर ,राजेश गेडाम, शरद मडावी आदी उपस्थित होते.
