
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांचे निर्देशानुसार सुधिर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव तसेच अमित भोईटे तहसीलदार राळेगाव यांचे मार्गदर्शनात दिनांक ७ मार्च २०२६ रोजी आदिवासीबहुल वरद मंडळातील वरध येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर संपन्न झाले सुरुवातीला सर्व मान्यवरांचे समाधान शिबिरामध्ये महसूल विभाग, पंचायत विभाग, भुमिअभिलेख विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग ,पोस्ट विभाग, वन विभाग,राष्ट्रीयकृत बँक, महिला आर्थिक विकास महामंडळ ,प्रथम फाउंडेशन संस्था, उमेद संस्था, असे एकूण १६ विभागातील कर्मचारीआपले स्टॉल सह उपस्थित होते ,सुरुवातीला सर्व मान्यवराचे स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री बिरसा मुंडा यांचे प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल कणसे मंडळ अधिकारी वरध यांनी केले. त्यानंतर अमित भोईटे तहसीलदार राळेगाव यांनी समाधान शिबिराची भूमिका व व्यायामाची भूमिका मांडली व शिबिरासबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे निमित्ताने मिलिंद चोपडे तालुका व्यवस्थापक उमेद श्रीमती रंजना देशकर तालुका व्यवस्थापक माविम,वैशाली पटेल पाईक प्रभाग संघ व्यवस्थापक यांनी मार्गदर्शन केले . सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी ग्राम विकास विभागसंदर्भात विविध योजनेची माहिती दिली. भरत गवळी उपाधीक्षक भूमि अभिलेख यांनी त्यांच्या विभागाच्या योजने बाबत मार्गदर्शन केले, हटकर व नपरीक्षेत्र अधिकारी यांनी सुद्धा त्यांच्या विभागातील योजनेबाबत मार्गदर्शन केले बोरकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक वडकी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले शालिक कनाके ग्राम महसूल अधिकारी यांनी डिजिटल सातबारा बाबत मार्गदर्शन केले. बालविवाह प्रतिबंधक तसेच व्यसनमुक्ती बाबत सागर विठाळकरसी.सी. डी .पि. ओ.यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर महसूल विभाग मार्फत प्रमाणपत्र वितरण व इतर सर्व विभागाचे लाभ वितरण करण्यात आले त्यामध्ये महसूल विभागामार्फत ४६९ उत्पन्न दाखले, २४५ सातबारा, २५० आठ अ,५१ जातीचे दाखले, ८नवीन रेशन कार्ड,२५० दुय्यम रेशन कार्ड, 1राष्ट्रीय प्रमाणपत्र, ३नॉन क्रिमिलिअर,९१ फेरफार प्रत वाटप करण्यात आले ,तसेच संजय गांधी विभागामार्फत स प्रमाणपत्र भरण्यात आले पंचायत विभागातर्फे १४ प्रमाणपत्र कृषी विभागातर्फे २६ प्रमाणपत्र शिक्षण विभागातर्फे १२ प्रमाणपत्र पुणे विभागातर्फे ११३ प्रमाणपत्र एकात्मिक बालविकासर्फे बेबी किट वाटप करण्यात आली परिवर्तन विभागातर्फे १९ एलसीएमसी कार्ड वाटप करण्यात आले प्रथम फाउंडेशन तर्फे नोंदणी संख्या १५, महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी २५० लोकांना लाभ वाटप करण्यात आला, उमेद फाउंडेशन तर्फे सहा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला ,आरोग्य विभाग तर्फे २१आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले, ७१ लोकांची आजाराची तपासणी करण्यात आली अशा प्रकारे समाधान शिबिरामध्ये १७५० लोकांनी लाभ घेतला.नावीन्यपूर्ण कार्यक्रमाअंतर्गत गुरुदेव विद्यालय वरध येथील विद्यार्थ्यांना शालेय विद्यार्थी त्यांची प्रशासना तर्फे तोंड ओळख या अंतर्गत प्रत्येक विभागाचे स्टॉलची माहिती देण्यात आली. तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वक्त्यांनी मार्गदर्शन केले, शिबिरामध्ये काही लाभार्थ्यांनी शिबिराबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. शिबिरामध्ये वरद मंडळातील १७ गावातील अंदाजे २००० नागरिक, महिला उपस्थित होत्या तसेच ग्रामपंचायतचे सरपंच पोलीस पाटील , स्वस्तधान्य दुकानदार व राजकीय पक्षाचे पदाधिकारी सुद्धा हजर होते शिबिरातील उत्कृष्ट संचालन सागर विटाळकर सी.डी.पी.ओ. व शालिक कनाके ग्राम महसूल अधिकारी यांनी केले. शिबिराचे आभार प्रदर्शन भगत निवासी नायब तहसीलदार यांनी केले. कार्यक्रमाकरिता अनिल कणसे मंडळ अधिकारी वरध, राजेंद्र तुमराम, धर्याशील बोंदाडे , गजानन जयस्वाल , राहुल उईके,नितीन जुमनाके, काजल किनाके ग्राम महसूल अधिकारी तसेच वरध मंडळातील सर्व ग्राम महसूल सेवक व पोलीस पाटील वरध यांनी अथक परिश्रम घेतले.
