
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
करंजी सोनाबाई या गावातून विद्यार्थी,शेतकरी,शेतमजूर यांना शाळा कॉलेज बाजारपेठेत जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो करंजी ते वाढोणा बाजार हा रस्ता हिंगणघाट आजनसरा जाण्यासाठी सोपा असल्यामुळे हा मार्ग जास्तच दळण वर्णाचा आहे पण या मार्गाने अद्यापही बस सेवा सुरू न झाल्याने नागरिकांना तहसील कार्यालय,दवाखाना व इतर कार्यास प्रवासा साठी चुरशीचा सामना करावा लागतो.विशेषत: शाळा, कॉलेजचे विद्यार्थी,नोकरदार महिला व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहे.
निवेदन देते वेळी, तेजस ठाकरे,अनुराग कडू,ऋतिक ठाकरे,सागर नेहारे, लोकेश ठाकरे , करण व गावातील आदी युवक उपस्थित होते.
निवेदनात करंजी ते राळेगाव किमान २ ते ३ बस फेरी सुरू करी या प्रमुख मागण्या ग्रामस्थानी आगारप्रमुखांकडे केल्या व विद्यार्थ्यांचे शाळा, कॉलेज सुरू होण्यापूर्वी प्रवासी रस्त्याची शहानिशा करून त्वरित बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करू असे आगार प्रमुख यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.
