
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पावसाळ्याचे दिवस आणि पूर परिस्थितीची शक्यता लक्षात घेता रेशन पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून शासनाने राशन कार्ड धारकांना तीन महिन्याचे धान्य जून मध्येच देण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्य शासनाच्या निर्णयानुसार सर्व रेशन दुकानदारांनी दररोज रेशन दुकान खुले ठेवून तीन महिन्याचे धान्य वितरण करावे अशा सूचना रास्त दुकानदारांना देण्यात आल्या असून तालुक्यातील राशन कार्ड धारकांनी शक्य तेवढ्या लवकर आपल्या धान्याची उचल करावी असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंतोदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना दरमाह मोफत धान्य पुरवठा केला जातो तथापि आगामी काळात पावसाळ्यातील पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शासनाने जून, जुलै,ऑगस्ट या तीन महिन्याचे आगाऊ धान्य वाटपाचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या तीन महिन्याच्या धान्याचे वाटप जून महीण्यातच ई मशीनद्वारे होणार असून दुकानदाराने टप्प्याटप्प्याने धान्य वितरित करण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यानुसार राशन कार्ड धारकांनी आपल्या धान्याची उचल शक्य तेवढ्या लवकर करावी असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी केले आहे
पाटील
