
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे दिनांक ९-७-२५ रोजी दुपारी ऐक वाजताच्या दरम्यान वर्धा नदीवरील कोसारा सोईट येथील पुलावरुन दोन फुट पाणी वाहत असल्याने खैरी ते वरोरा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. तसेच वर्धा नदीपात्रालगतच्या नागरीकांना संतर्क राहण्याचे आवाहन उत्तम निलावाड तहसीलदार मारेगाव यांनी केले आहे.यावेळी प्रशासनाचे महसूल सेवेक कोसारा, पोलिस पाटील कोसारा उपस्थित होते . पण मारेगाव पोलिस पुलावरुन दोन फुट वाहत असताना हजर नसल्याने टुव्हिलर , ट्रक हे पुलावरुन येत आहे यावरुन पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष दिसुन येत आहे.
