राळेगाव नगरपंचायतच्या धडक कारवाईत अनेक दुकाने केले “सिल

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

     

राळेगाव नगरपंचायत च्या अंतर्गत असलेल्या राळेगाव शहरातील अनेक दुकान दारांनी नगरपंचायतचा कर न भरल्याने राळेगाव नगरपंचायत ची टीम वसुली करता ओंन ग्राउंड उतरली व वसुलीसाठी धडक कारवाई करीत काही दुकानांना सेल केले.
सध्या सुरू असलेल्या मार्च एंडिंग मुळे अनेक दुकानदाराकडे नगरपंचायतच्या कराची थकबाकी ही हजारोच्या घरात तर काही दुकानदारांकडे लाखोच्या रूपात असताना आज दिनांक 11- 3 – 2022 ला नगरपंचायत राळेगाव मुख्याधिकारी व त्यांचे संपूर्ण टीमने वसुलीचे काम हाती घेतले व जे दुकानदार कर भरू शकली नाही अशा दुकानांना सील केले. कोरोनाच्या महामारीनंतर छोट्या मोठ्या व्यावसायिकावर उद्योगाची कुऱ्हाड कोसळली असताना कसेतरी पूर्वपदावर आता लहान मोठे धंदे येत असताना काही लोकांनी सतत कराचा भरणा केला नाही गेल्या अनेक वर्षापासून पाच ते दहा वर्षापासून अनेक दुकानदारांनी किंवा व्यवसायिकांनी नगरपंचायतला कुठल्याही कराचा भरणा न केल्यामुळे हे पाऊल उचलावे लागले असे राळेगाव नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांनी बोलताना सांगितले.