
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येत्या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून महसूल विभाग व बँकेने पुढाकार घेत शेतकऱ्यांसाठी पिक कर्ज मेळावा भारतीय स्टेट बँक शाखा राळेगाव यांच्या प्रांगणात शाखा व्यवस्थापक पंकज पांगारकर यांच्या पुढाकार मध्ये घेण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार डॉ रवींद्र कुमार कानडजे नायब तहसीलदार दिलीप बदकी.निलेश ठाकरे,दिलीप खडगी, रविकांत वेले, हरीश गडदे.गजानन खडसे सहाय्यक निबंधक कैलास खटारे सहकारी संस्थांचे कर्मचारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.पीक कर्जा करता लागणारी सर्व कागदपत्रे सहज उपलब्ध करून देण्याचे आव्हान यावेळी महसूल विभाग ला करण्यात आले बँक व्यवस्थापक व महसूल विभाग यांनी वारंवार संपर्कात राहून अधिकाअधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप त्वरित करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आव्हान याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी केले.
