
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असून राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक हवा आणि पाऊस झाला आणि त्या वादळात मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने रस्त्यावरून प्रवास करणारी वाहन धारकांना एक तासांपर्यंत म्हणजेच रस्ता सुरळीत होईपर्यंत प्रतिक्षा करावी लागली सोबतच गावातील अनेक घरावरील टिनपत्रे उडून गेल्यामुळे घरमारकांची सुद्धा धावपळ झाली.त्यावेळी अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही वेळा पर्यंत जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
